लैंगिक जीवन : 'या' दिवसात पार्टनरला होते शारीरिक संबंधाची तीव्र इच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:25 PM2019-04-08T15:25:10+5:302019-04-08T15:25:24+5:30
शारीरिक संबंधांबाबत एक सर्वसामान्य धारणा आहे की, पुरुषांना महिलांच्या तुलनेत शारीरिक संबंधाची अधिक गरज असते.
(Image Credit : blog.doctoroz.com)
शारीरिक संबंधांबाबत एक सर्वसामान्य धारणा आहे की, पुरुषांना महिलांच्या तुलनेत शारीरिक संबंधाची अधिक गरज असते. पण काही खास दिवस असतात जेव्हा काही महिलांना पुरुषांपेक्षा जास्त शारीरिक संबंधाची आतुरता असते. जर या दिवसांकडे खास लक्ष दिलं तर तुमचं लैंगिक जीवन आणखी रोमांचक होऊ शकतं.
हे जाणून घेणं गरजेचं
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पार्टनरसोबत इंटीमेट होण्याआधी तुमच्यासाठी हे जाणून महत्त्वाचं ठरतं की, ३० ते ४० वयात आल्यावर महिलांमध्ये शारीरिक संबंधाची रुची कमी होते. तज्ज्ञ याला वाढत्या अपेक्षांचं ओझं हे कारण सांगतात. त्यामुळे हे गरजेचं आहे की, तुम्ही त्यांच्या जबाबदाऱ्या शेअर करा जेणेकरून त्या तुमच्यासोबत रोमॅंटिक क्षण शेअर करू शकतील.
मासिक पाळीदरम्यान
जास्तीत जास्त महिला मासिक पाळीदरम्यान इंटरकोर्स टाळतात. कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा त्रास होऊ नये म्हणून हे योग्यही आहे. पण याचा अर्थ हा नाही की, तुम्ही त्यांच्याजवळ जाऊ नये. खरंतर या दिवसात शारीरिक-मानसिक बदलांमुळे पार्टनर त्यांना पार्टनरच्या अधिक जवळ रहायचं असतं.
पाच ते सात दिवस
तज्ज्ञांनुसार, मासिक पाळी पूर्ण झाल्यावर पाच ते सात दिवसांपर्यंत महिला शारीरिक संबंधाच्या अधिक मूडमध्ये असतात. महिलांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तरुणींच्या ब्रेन वेव्सवर फार अभ्यास करण्यात आला ज्यात असं आढळलं की, मासिक पाळीच्या पाच ते सात दिवसात शारीरिक संबंधामुळे जास्तच आनंदाचा अनुभव येतो.
मासिक पाळीनंतरही राहतात अॅक्टिव
महिलांवर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार, महिला त्यांच्या मासिक पाळीच्या ५ ते ७ दिवस संबंध ठेवण्यास आतुर असतात. त्यासोबतच मासिक पाळी संपल्यानंतरही त्यांच्यात संभोग करण्याची फार इच्छा असते.
हे आहे कारण
रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, मासिक पाळीनंतर महिलांमध्ये शारीरिक संबंधासाठी तीव्र इच्छा होणे स्वाभाविक आहे. कारण या दिवसात गर्भधारणेची शक्यता अधिक वाढत असते. तसेच हेही समोल आलं की, यावेळी पुरूषही महिलांपेक्षा जास्त अट्रॅक्ट होतात.