आंबोलीतील कापडी पूल पाण्याखाली, 10 ते 12 जण अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:51 PM2017-07-19T19:51:03+5:302017-07-19T20:23:35+5:30

ऑनलाइन लोकमत सावंतवाडी, दि. 19 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी ही मुसळधार पाऊस सुरू असून, आंबोली चौकुळ येथील कापडी ...

10 to 12 people stuck under Ambali cloth pool, under water | आंबोलीतील कापडी पूल पाण्याखाली, 10 ते 12 जण अडकले

आंबोलीतील कापडी पूल पाण्याखाली, 10 ते 12 जण अडकले

Next

ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. 19 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी ही मुसळधार पाऊस सुरू असून, आंबोली चौकुळ येथील कापडी पुलावर पाणी आल्याने पंचायत समिती बैठकीसाठी गेलेले सभापती रवींद्र मडगावकर यांच्यासह दहा ते बारा अधिकारी चौकुळ येथे अडकून पडले आहेत.

सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्येच हे कापडी पूल असून चंदगड परिसरात पाऊस पडला तरी या पुलावर पाणी येते, अनेकदा दोन दोन दिवस पाणी ओसरत नाही, त्यातच गेले तीन दिवस आंबोली आणि चौकुळ येथे पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या पुलावरचे पाणी ओसरण्यास वेळ लागत आहे. चौकूळकडे जाणारी एसटी वाहतूक ही आंबोलीपर्यंत थांबवण्यात आली आहे. चौकूळ येथील पुलावर पाणी आल्याने चौकूळ कुभवडे आदिसह पाच गावाचा सर्पंक तुटला आहे.

दरम्यान सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्या नंतर पुलावरचे पाणी ओसरण्यास सुरूवात होईल त्यानंतर या अधिकारी व पदाधिकारी यांना सुरक्षित पणे पुलावरून पलीकडच्या बाजूला सोडण्यात येणार आहे असे ग्रामस्थानी सांगितले आहे.अधिकारी व पदाधिकारी यांच्या प्रमाणे काही पर्यटक ही या पुरात अडकून पडले होते.

https://www.dailymotion.com/video/x8458qz

Web Title: 10 to 12 people stuck under Ambali cloth pool, under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.