Sindhudurg: फोंडाघाट तपासणी नाक्यावर दहा लाखांची रक्कम ताब्यात, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Published: March 19, 2024 04:19 PM2024-03-19T16:19:55+5:302024-03-19T16:20:26+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई 

10 lakhs seized at Fondaghat check post, police action in the wake of Lok Sabha elections | Sindhudurg: फोंडाघाट तपासणी नाक्यावर दहा लाखांची रक्कम ताब्यात, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

Sindhudurg: फोंडाघाट तपासणी नाक्यावर दहा लाखांची रक्कम ताब्यात, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

कणकवली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर  एका चार चाकी गाडीत दहा लाखाची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थिर सर्वेक्षण पथक (एस.एस.टी.) व पोलिसांनी आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली.

दरम्यान, ही रक्कम बांधकाम व्यावसायातील असल्याचा दावा संबधित व्यावसायिकाने केला आहे. मात्र, याची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून, रक्कम बेहिशोबी असल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका चारचाकीची तपासणी फोंडाघाट तपासणी नाक्यावर मंगळवारी पोलिसांनी केली. त्यावेळी त्या गाडीमध्ये १० लाखाची रक्कम आढळून आली.  पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांनी पुढील कारवाईसाठी  एसएसटी विभागाचे प्रमुख यांच्या ताब्यात ती रक्कम दिली.  यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, बाणे,  पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, पोलिस हवालदार मंगेश बावदाने, पोलिस शिपाई सचिन माने, किरण मेथे आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे. मात्र, ही एवढी मोठी रक्कम का आणण्यात आली ? ती कुठे घेऊन जाण्यात येत होती ? याची कसून तपासणी सुरू असून लवकरच त्याबाबतची  माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.आयकर विभागाच्या पथकालाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.

Web Title: 10 lakhs seized at Fondaghat check post, police action in the wake of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.