सिंधुदुर्गात १,०६२ ग्राहकांची वीज जोडणी तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:22 AM2021-03-15T11:22:12+5:302021-03-15T11:24:47+5:30

mahavitaran Sindhudurg- सिंधुदुर्गातील १ लाख ७ हजार २४० ग्राहकांकडे ५५.५७ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे . यामध्ये कणकवली विभागातील ५२ हजार ६२० ग्राहकांकडे २८.४८ कोटी तर कुडाळ विभागातील ५४ हजार ६२० ग्राहकांकडे २७.०८ कोटी रूपयांची थकबाकी आहे .१ ते १२ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या सिंधुदुर्गातील १०६२ ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे.

1,062 customers disconnected in Sindhudurg | सिंधुदुर्गात १,०६२ ग्राहकांची वीज जोडणी तोडली

सिंधुदुर्गात १,०६२ ग्राहकांची वीज जोडणी तोडली

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गात १,०६२ ग्राहकांची वीज जोडणी तोडलीवीज बील थकबाकी ५५.२७ कोटी,  महावितरणचा बील भरण्यास तगादा

कणकवली : सिंधुदुर्गातील १ लाख ७ हजार २४० ग्राहकांकडे ५५.५७ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे . यामध्ये कणकवली विभागातील ५२ हजार ६२० ग्राहकांकडे २८.४८ कोटी तर कुडाळ विभागातील ५४ हजार ६२० ग्राहकांकडे २७.०८ कोटी रूपयांची थकबाकी आहे .१ ते १२ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या सिंधुदुर्गातील १०६२ ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे.

यामध्ये कणकवली विभागातील २१७ आणि कुडाळ विभागातील ८४५ थकीत वीजग्राहकांचा समावेश आहे . १ ते १० मार्चपर्यंत केवळ वाणिज्य ग्राहकांवरच कारवाई करण्यात आली होती . ११ मार्च पासून सर्व प्रकारच्या थकीत ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे .

कोरोना प्रादुर्भावामुळे सन २०२० या वर्षात अर्थव्यवस्था कोलमडली . मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाले आणि फेब्रुवारी २०२० पासून अनेक ग्राहकांनी वीजबिल भरणे बंद केले . त्यामुळे ३१ मार्च २०२० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार ४८३ ग्राहक थकबाकीदार झाले . त्यांनी २८.४७ कोटी रुपयांची रक्कम थकीत ठेवली .

महावितरण कंपनीने प्राधान्याने या थकीत ग्राहकांकडे बील भरण्यास तगादा लावला आणि १३ मार्च २०२१ पर्यंत त्यापैकी आता १४,९८२ ग्राहकांकडे १०.९१ कोटी रुपये येणे रक्कम शिल्लक राहिली आहे . १३ मार्च २०२१ पर्यंत सिंधुदुर्गातील वीज बील थकबाकी ५५.२७ कोटी आहे . त्यामुळे महावितरणने थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांची जोडणी तोडण्यास सुरूवात केली आहे . १ मार्चपासून १० मार्चपर्यंत केवळ वाणिज्य ग्राहकांवर कारवाई झाली .

कणकवली विभागातील थकीत असलेल्या ११२ व कुडाळ विभागातील ५१६ वीज बिल थकीत ग्राहकांची वीज ११ व १२ मार्च या दोन दिवसात तोडण्यात आली . अद्याप या महिन्याची देयके अदा करणे बाकी आहे . मुळात प्रतिवर्षी मार्च महिना अखेरीस वीज ग्राहकांच्या हिशोबाची पूर्तता होत असते. मात्र, मागील मार्च महिन्यातच कोरोनामुळे हिशोब करणे राहून गेले .

तरीही शासनाने हप्ते , विलंब आकार माफ , अतिरिक्त सवलत ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला. अद्यापही महावितरणने ग्राहकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे . परंतु आता थकबाकीचा बोजा महावितरणच्या डोईजड झाला आहे .

थकीत ग्राहकांची वीज सुरू ठेवणे म्हणजे बील भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय करण्यासारखेच आहे . अनेकजण आम्ही वीज बिल भरले पण ज्यांनी भरले नाही , त्यांची वीज का नाही तोडत ? असे प्रश्न विचारत आहेत . त्यामुळे महावितरणकडून यापुढील काळात वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: 1,062 customers disconnected in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.