कणकवलीतून ११ अर्ज दाखल
By admin | Published: February 6, 2017 12:32 AM2017-02-06T00:32:25+5:302017-02-06T00:32:25+5:30
फोंडाघाटमधून संदेश पटेल, कलमठ प्रज्ञा ढवण तर नाटळसाठी अक्षता सावंत
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रविवारी कणकवली तालुक्यात ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे ३ तर पंचायत समितीच्या ८ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. फोंडाघाट जिल्हा परिषदेसाठी संदेश पांडुरंग सावंत -पटेल यांनी अपक्ष म्हणून, कलमठमधून प्रज्ञा प्रदीप ढवण यांनी भाजपमधून तर नाटळमधून अक्षता अनिल सावंत यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी कणकवली तहसील कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांची वर्दळ दिसून येत होती.
तालुक्यातील पंचायत समितीच्या सात प्रभागांसाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये कासार्डेतून सुधाकर सुरेश पेडणेकर (शिवसेना), बिडवाडी- विजय सखाराम तांबे (भाजपा), लोरे-प्रदीप बळीराम गुरव (अपक्ष), वरवडे-प्रतीक्षा प्रशांत सावंत (भाजपा), कलमठ-विश्वनाथ बाबाजी आचरेकर (शिवसेना), नाटळ-विशाखा विलास पुजारे (शिवसेना) तर नरडवे प्रभागातून संतोष रामचंद्र घाडीगांवकर (शिवसेना) व गणेश सहदेव ढवळ (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कणकवलीच्या प्रातांधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे हे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले.
कलमठ जिल्हा परिषदेसाठी भाजपतर्फे प्रज्ञा ढवण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, गितांजली कामत, भाई परब, प्राची कर्पे, विजय चिंदरकर, सदा चव्हाण, संतोष पुजारे, प्रथमेश तेली, अमोल चिंदरकर, भूपेश चव्हाण,संतोष मेस्त्री, सुनील गावडे, नीलेश पुजारे, महेश मेस्त्री, सोनू शेख, विजय खरात, सुरेश वर्देकर, प्रदीप ढवण, प्रसाद देसाई, वेदस्तु ढवण आदी उपस्थित होते.
फोंडाघाटमधून संदेश पटेल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी हर्षनंद लाड, उत्तम रेवडेकर, कृष्ण पारकर आदी उपस्थित होते तर नाटळमधून अक्षता सावंत यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तेव्हा सोसायटी चेअरमन प्रदीप सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, विलास पुजारे आदी उपस्थित होते. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)