११ विद्यार्थ्यांना मिळाले सुवर्ण पदक
By Admin | Published: February 18, 2015 09:59 PM2015-02-18T21:59:28+5:302015-02-18T23:45:46+5:30
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा : कासार्डे विद्यालयाचे यश
नांदगांव : स्टार कला अकादमी कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय फाईव्हस्टार मानांकनासह गोल्ड मेडल व सन्मानपत्रक प्राप्त झाले आहे.या राज्यस्तरीय स्पर्धेचा प्राथमिक निकाल सोमवारी जाहीर झाला. या स्पर्धेत विद्यालयातील ४०० मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत फाईव्हस्टार मानांकनासह गोल्ड मेडल प्राप्त झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज माळवदे, कमलेश लाड, सायली पालव, शुभम घाडी, धीरज राणे, जान्हवी राणे, नेहा सुवारे, हर्षला घाडी, साईप्रसाद बिजितकर यांना गोल्डमेडल, तर सर्वेश पाताडे व दिव्यश्री मारकड यांचा समावेश आहे. त्यांना राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत गोल्डमेडल, फाईव्हस्टार मानांकन, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.याशिवाय प्रशालेच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल व उज्ज्वल यशाबद्दल कलाध्यापक सी. एस. कल्याणकर यांना स्टार कलाध्यापक व मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांना स्टार मुख्याध्यापक पुरस्कार
प्राप्त झाला आहे. २८ मार्च २०१५ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे स्टार कला अकादमीच्यावतीने यशस्वितांचा सत्कार समारंभ होणार आहे.सर्व यशस्वितांचे कासार्डे विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कार्यवाह मधुकर खाडये, सुभाष पाताडे, रवींद्र पाताडे, प्राचार्य पी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. बी. शेख, पर्यवेक्षक ए. ए. मुद्राळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)