जिल्ह्यातील ११0 डॉक्टर धावले
By admin | Published: February 12, 2017 11:34 PM2017-02-12T23:34:20+5:302017-02-12T23:34:20+5:30
ंकॅन्सरबाबत केली जनजागृती : कणकवलीत ‘कनकरन मॅरेथॉन’चे आयोजन
कणकवली : शरीरासाठी धावणे हा सुंदर व्यायाम असून याबाबत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याकरिता कार्यरत असलेले सिंधुदुर्गातील काही डॉक्टर आपले आरोग्य चांगले रहावे याकरिता पहाटे नियमित धावतात. ही धावण्याची चळवळ वाढत असून रविवारी पहाटे कणकवली येथे जिल्ह्यातील ११० हून अधिक डॉक्टरांनी ‘खोजो कॅन्सर, मिटाओ कॅन्सर’ असा संदेश देत ‘कनकरन मॅरेथॉन’ च्या माध्यमातून दौड केली.
डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग, इंडियन मेडिकल असोसिएशन, कणकवली यांच्या विद्यमाने ‘कनकरन’चे आयोजन केले होते. उपजिल्हा रुग्णालयासमोर डॉ. एम. डी. म्हसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रोटरी क्लब आॅफ कणकवली सेंट्रलच्यावतीने येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये १९ फेब्रुवारी रोजी ‘मिशन कॅन्सर कंट्रोल इंडिया’ अंतर्गत कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन कणकवलीत आणण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली.
५ किलोमीटर, १० किलोमीटर, १५ किलोमीटर तसेच २१ किलोमीटर अंतर अशा विविध टप्प्यांमध्ये ही मॅरेथॉन घेण्यात आली. पुरुष डॉक्टरांबरोबरच महिला डॉक्टर व मुलेही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. विविध अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून प्रथम तीन क्रमांकाचे विजेते घोषीत करण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी डॉ. बी. एम. म्हाडेश्वर, डॉ. अनंत नागवेकर, डॉ. चं. फ. राणे, डॉ. डी. व्ही. सोडल. डॉ. शेळके, डॉ. सूर्यकांत तायशेट्ये, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. सुहास पावसकर, डॉ. समीर नेवरे, डॉ. नितीन शेट्ये, डॉ. नीलेश कोदे, डॉ. विनय शिरोडकर, डॉ. संजय पावसकर, डॉ. प्रशांत मोघे, डॉ. गीता मोघे, डॉ. हेमा तायशेट्ये आदी डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.(प्रतिनिधी)