२५ पदांसाठी ११५ उमेदवार पात्र

By Admin | Published: July 23, 2016 09:52 PM2016-07-23T21:52:31+5:302016-07-23T23:54:30+5:30

कंत्राटी पद्धत भरती प्रक्रिया : दहा आरक्षित पदे रिक्त राहणार

115 candidates eligible for 25 posts | २५ पदांसाठी ११५ उमेदवार पात्र

२५ पदांसाठी ११५ उमेदवार पात्र

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एन.आर.एच.एम.) अंतर्गत भरण्यात येणाऱ्या ३५ कंत्राटी पद्धतीच्या जागांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ती २६ जुलैपर्यंत चालणार आहे. दहा आरक्षित पदे रिक्त राहिली असून, २५ पदांसाठी ११५ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ३५ पदांसाठीची भरती प्रक्रिया १८ जुलैपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी एकूण २९०
उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. कागदपत्रांच्या छाननीनंतर ४०
अर्ज अपात्र, तर २५० अर्ज पात्र ठरले होते. अपात्र ठरलेल्या ४० उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी हरकत घेतली होती. त्यापैकी सात उमेदवारांच्या हरकती ग्राह्य ठरल्या होत्या. त्यामुळे एकूण २५७ उमेदवार भरती प्रक्रियेत पात्र ठरले होते.
या २५७ उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या शेवटच्या वर्षाच्या गुणांचा विचार करून प्रत्येक पदास १:५ या प्रमाणे ११५ उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली आहे. या मुलाखती २६ जुलैपर्यंत चालणार आहेत. २६ जुलै रोजी नर्सिंगच्या उमेदवारांच्या मुलाखती, तर २५ जुलै रोजी उर्वरित सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. (प्रतिनिधी)


दहा पदांना
उमेदवारच नाहीत
एन.आर.एच.एम. अंतर्गत भरण्यात येणाऱ्या ३५ पदांपैकी नऊ पदांना आवश्यक प्रवर्गाचे उमेदवार न मिळाल्याने ही पदे रिक्त राहणार आहेत.
तर एका पदासाठी उपलब्ध उमेदवारापैकी उमेदवाराची कमतरता असल्याने त्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे ३५ पैकी १० पदे उमेदवारांअभावी रिक्त राहणार आहेत.


रिक्त पदांचा तपशील
रिक्त राहिलेल्या वैद्यकीय अधिकारी पदामध्ये एकूण पदे पाच पैकी दोन उमेदवार उपलब्ध झाले आहेत. जिल्हा समूह संघटक या पदासाठी उपलब्ध उमेदवारास अनुभवाअभावी अपात्र ठरविले.
लेखापालसाठी चार पदे होती. या चारही पदांसाठी तालुकासमूह संघटक एक पद, सांख्यिकी अन्वेषक एक पद यांना एकही आवश्यक प्रवर्गातील उमेदवार प्राप्त नसल्याने ही पदे रिक्त राहणार आहेत.

Web Title: 115 candidates eligible for 25 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.