देवगड तालुक्यातील १२ प्रस्ताव मंजूर
By admin | Published: June 30, 2016 10:03 PM2016-06-30T22:03:44+5:302016-06-30T23:57:34+5:30
संजय गांधी निराधार योजना बैठक : लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी
देवगड : संजय गांधी निराधार योजना समिती देवगडची बैठक अध्यक्ष जयदेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार शेळके यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय देवगड येथे पार पडली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेतील १२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करून परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली.
यावेळी संजय गांधी अपंग योजनेतून गजानन शंकर सांवत (वळिवंडे), जयसिंग मोतिराम पारकर (तळेबाजार), संजय गांधी विधवा योजनेतून नीलम बाळकृष्ण कदम (कुवळे), विजया गोपाळ लाड (दहिबाव) तर सुलोचना हरिश्चंद्र बारवकर (विठ्ठलादेवी फणसगांव), दीक्षा दीपक घाडी (तळवडे), अनुराधा राजीव शेलार (तळवडे), प्रतिमा पद्माकर कोकाटे (फणसगांव), अरुणा पांडुरंग बिर्जे (धालवली).
श्रावणबाळ योजनेतून लक्ष्मी गोविंद गावकर (मिठमुंबरी), इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतून बाळकृष्ण साबाजी कदम (इळयेसडा), इंदिरा गांधी विधवा योजनेतून धनश्री धैर्यवान दहिबावकर (जामसंडे) या लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत.
यावेळी देवगडचे नायब तहसीलदार शेळके, सदस्य जगन्नाथ घाडी, विलास साळसकर, हर्षा ठाकूर, वर्षा पवार, आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)