इन्सुली नाक्यावर १४ लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:58 PM2018-09-30T22:58:51+5:302018-09-30T22:58:54+5:30

14 lakh liquor seized on insulin nose | इन्सुली नाक्यावर १४ लाखांची दारू जप्त

इन्सुली नाक्यावर १४ लाखांची दारू जप्त

Next

बांदा : इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याहून मळगावच्या दिशेने ट्रकमधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १४ लाख रुपये किमतीच्या दारूसह एकूण १७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक एकनाथ रमेश शेर्लेकर (वय ३४, रा. शेर्ले-तेलीवाडी) याला अटक केली.
याला मदत करणारे रविराज अंबाजी सावंत (२६, रा. तांबोळी-खालचीवाडी) व कृष्णा रमेश शेर्लेकर (३०, रा. शेर्ले-तेलीवाडी) यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी ६.०० च्या दरम्यान करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांनी बांदा पोलीस ठाण्याला भेट देत कारवाईची माहिती घेतली.
अधिक माहिती अशी की, सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास बांदा सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना गोव्याहून मळगावच्या दिशेने ट्रकमधून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तपासणी नाक्यावर निरीक्षक कळेकर यांनी आपले सहकारी हवालदार बापू झोरे, पप्या पावसकर, नागेश गावकर, हेमंत पेडणेकर, विक्रांत मोरे यांच्यासह सापळा रचला. येणाºया ट्रकला (एमएच ०४-डिके-४७०३) तपासणीसाठी थांबविण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा ३३५ खोकी आढळली.
पोलिसांनी तपासणी करून आतील गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे १४ लाख रुपये किमतीचे तब्बल ३३५ खोकी जप्त केली तर ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी ट्रकचालक एकनाथ शेर्लेकर याला अटक केली. त्याला मदत करणारे रविराज सावंत, कृष्णा शेर्लेकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: 14 lakh liquor seized on insulin nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.