गणपती पावला, सिंधुदुर्ग पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 31, 2022 11:44 AM2022-08-31T11:44:56+5:302022-08-31T11:45:22+5:30

मागील कित्येक वर्ष रखडलेल्या बढतीचे आदेश निघाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

157 police personnel of Sindhudurg police force promoted | गणपती पावला, सिंधुदुर्ग पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

गणपती पावला, सिंधुदुर्ग पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

googlenewsNext

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पोलिसांना गणपती पावला असून जिल्ह्याच्या पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा बढतीचे हे आदेश काढले. पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार व पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक २७, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार १३० आदींचा या भरतीमध्ये समावेश आहे. खुला प्रवर्ग व राखीव प्रवर्गातून या बढत्या देण्यात आल्या. गेले काही वर्ष या बढत्या रखडलेल्या होत्या. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गणपतीत जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देवून खुशखबर दिली. मागील कित्येक वर्ष रखडलेल्या बढत्या देण्यात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: 157 police personnel of Sindhudurg police force promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.