कणकवलीत १७७ प्रकरणे निकाली
By admin | Published: December 14, 2014 08:10 PM2014-12-14T20:10:10+5:302014-12-14T23:53:15+5:30
लोकअदालत : ४४ लाख २९ हजार ५४६ रुपयांची तडजोड
कणकवली : येथील दिवाणी न्यायालयात आयोजित लोकअदालतीमध्ये आलेल्या १२३९ वादपूर्व प्रकरणांपैकी १६२ आणि न्यायालयात दाखल १३४ पैकी १५ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली, तर एकूण ४४ लाख २९ हजार ५४६ रुपयांची तडजोड झाली.
कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश सोनिया कानशिडे यांनी कणकवली येथे घेण्यात आलेल्या लोकअदालत कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या लोकअदालतीमध्ये बॅँक प्रकरणातील ४२९ वादपूर्व प्रकरणे होती. त्यापैकी ६२ प्रकरणे निकाली निघाली. त्यात ४० लाख ४२ हजार ६७८ रुपयांची तडजोड झाली.
वीज वितरणची १५१ पैकी १८ प्रकरणे निकाली झाली. त्यात २ लाख ५० हजार ४४ रुपयांची तडजोड झाली. बीएसएनएलसंबंधी ६२३ प्रकरणांपैकी ६२ प्रकरणे निकाली झाली. त्यात १ लाख ३६ हजार ८२४ रुपयांची तडजोड झाली.
एकूण सहा पॅनेल या अदालतीमध्ये नेमण्यात आली होती. सरकारी वकील एन. एन. कुलकर्णी, डी. पी. तानवडे, राजेंद्र सावंत, जागृती शेटये, प्रशिक्षणार्थी सहायक गटविकास अधिकारी उत्कर्ष वागरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुहास कोरेगावे, दिवाकर कोरगावकर, शोभा ढवळ, मारुती जाधव, प्रदीप वारंग, दादा कुडतरकर यांचा पॅनेलमध्ये पंच म्हणून समावेश होता. पोेलीस प्रकरणांसाठी कणकवलीचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, वैभववाडीचे निरीक्षक बर्वे यांनी काम पाहिले. सहायक अधीक्षक यु. आर. कारेकर, एन. पी. मठकर, वरिष्ठ लिपिक एम. आर. काणेकर यांच्यासह न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी लोकअदालत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
३६ पैकी २0 प्रकरणे निकाली
वैभववाडी व कणकवली पोलिसांकडील ३६ अदखलपात्र प्रकरणांपैकी २० प्रकरणे निकाली झाली.
चेक बाऊन्सच्या ७५ पैकी ६ प्रकरणांत निकाल झाला. पोटगीची १०, दिवाणी २० आणि इतर दिवाणी २० पैकी एकाही प्रकरणात निकाल झाला नाही.
बॉम्बे पोलीस अॅक्ट आणि मोटर व्हेईकल अॅक्टमधील ९ प्रकरणांत दंड वसूल झाल्यामुळे सर्व प्रकरणे निकाली झाल्याची माहिती देण्यात आली.