कणकवली तालुक्यात १८ जणांची माघार

By admin | Published: February 13, 2017 11:01 PM2017-02-13T23:01:08+5:302017-02-13T23:01:08+5:30

फोंडाघाट मतदारसंघात पंचरंगी लढत : सहा ठिकाणी बंडखोरी, १८ मतदार संघात सेना-भाजपची छुपी युती

18 retired people in Kankavali taluka | कणकवली तालुक्यात १८ जणांची माघार

कणकवली तालुक्यात १८ जणांची माघार

Next


कणकवली : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी दाखल केलेल्या २९ उमेदवारी अर्जापैकी ८ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४७ अर्जांपैकी १० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. सोमवारी तालुक्यात १८ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ६४ उमेदवार उरले आहेत. तर जानवली व बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांनी छाननी अर्जाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील केल्याने तेथील उमेदवाराना १५ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर या दोन मतदार संघातील निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी २९ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ५३ असे एकूण ८२ अर्ज उमेदवारांनी दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. या दिवशी १८ अर्ज मागे घेण्यात आले. येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत- शिंदे, तहसीलदार गणेश महाडिक, शिरस्तेदार पी.बी. पळसुले, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत आदी अधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज माघारी नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये जिल्हा परिषद मतदार संघ फोंडामधून - राजेंद्र राधाकृष्ण पावसकर (राष्ट्रवादी), सुभाष मारुती सावंत (भाजप पर्यायी उमेदवार ).
कळसुली - श्रध्दा विलास गावकर (राष्ट्रवादी). चंदना चंद्रहास राणे (अपक्ष). नाटळ - ज्योती किरण गावकर (भाजप), स्नेहल सतीश पाताडे (राष्ट्रवादी), श्रद्धा सुभाष सावंत (अपक्ष), रंजीता राजेश पाताडे (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. तर पंचायत समिती मतदार संघ तळेरे मधून सुनील कुलकर्णी (अपक्ष), प्रकाश बापू पाटणकर (अपक्ष). नांदगाव - वृषाली ऋषिकेश मोरजकर (अपक्ष). फोंडा-हर्षदा हेमंत रावराणे (भाजप पर्यायी उमेदवार). लोरे- कृष्णा महादेव एकावडे (अपक्ष ), प्रदीप बळीराम गुरव (अपक्ष). हरकुळ खुर्द - राकेश रविकांत रासम (अपक्ष). कळसुली - प्रिया मनोहर मालंडकर (राष्ट्रवादी). नरडवे - सुरेश शांताराम ढवळ (अपक्ष), गणेश सहदेव ढवळ (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
तालुक्यात पंचायत समितीच्या १ जागेवर मनसे, १० जागांवर शिवसेना, ६ जागांवर भाजप, १४ जागांवर काँग्रेस, १ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस तर ५ जागांवर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. जानवली व बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील चित्र १५ फेब्रुवारीला स्पष्ट होईल. जिल्हा परिषदेच्या २ जागांवर मनसे, ५ जागांवर शिवसेना, ५ जागांवर भाजप, ८ जागांवर काँग्रेस तर १ जागेवर अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 18 retired people in Kankavali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.