इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूसह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुजरात येथील एक जण ताब्यात

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 29, 2024 12:12 PM2024-05-29T12:12:36+5:302024-05-29T12:13:27+5:30

बांदा ( सिंधुदुर्ग ) : मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई ...

19 lakh worth of Goa-made liquor seized at Insuli checkpoint; One person from Gujarat detained | इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूसह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुजरात येथील एक जण ताब्यात

संग्रहित छाया

बांदा (सिंधुदुर्ग ) : मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इक्बाल जुमाभाई थेबा (२६, राह जुनागड सिटी, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज, बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या कारवाईत १२ लाखांचा ट्रक (जीजे ०१ डीवाय ५५९४) ताब्यात घेण्यात आला. तसेच ७ लाख २० हजार रुपयांची मोबी व्होडका ऑरेंज असे लेबल असलेल्या दारूचे २०० बॉक्स जप्त करण्यात आलेत. तसेच ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १९ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार व रोहित कांबळे यांनी केली.

Web Title: 19 lakh worth of Goa-made liquor seized at Insuli checkpoint; One person from Gujarat detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.