जुनी पेन्शन हक्क संघटनेचे १९ जानेवारीचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:56 PM2019-01-17T18:56:03+5:302019-01-17T18:57:24+5:30
आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत जिप प्रशासनाने उचित कार्यवाही सुरु केल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने शनिवार दि १९ जानेवारी रोजी जिप कार्यालयासमोर छेडण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताड़े यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत जिप प्रशासनाने उचित कार्यवाही सुरु केल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने शनिवार दि १९ जानेवारी रोजी जिप कार्यालयासमोर छेडण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताड़े यांनी दिली.
शासनाने ३० आॅक्टोंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचा?्यांची जुनी पेन्शन योजना बंद करत राज्यातील कर्मचा?्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करावी, २००५ नंतर नियुक्ती दिलेल्या परंतू मयत असलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाचे लाभ देण्यात यावेत, सद्या चालू असलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या कपातीमध्ये संभ्रमावस्था आहे.
त्यामुळे कपातीस स्थगिती दयावी, आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करा यासह विविध मागण्यांकडे शासन व् प्रशासन यांचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने शनिवार दि. १९ जानेवारी रोजी जिप कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार होते. मात्र आज संघटनेच्या झालेल्या चर्चेत उचित कार्यवाही सुरु असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली त्यामुळे १९ जानेवारीचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाताड़े यांनी दिली.