वैभववाडीतील एका नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्याकडून २० कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:43 PM2020-01-15T13:43:30+5:302020-01-15T13:46:35+5:30
बाजारपेठेतील एका नामाकिंत को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यावरून सहीशिवाय २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी सोमवारी सायंकाळी बँकेत जाऊन धिंगाणा घातला. संतप्त झालेल्या एका ग्राहकाने बँकेवर दगडही फेकला. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शाखेत दाखल झालेल्या विभागीय व्यवस्थापकाने चार दिवसांत ग्राहकांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
वैभववाडी : बाजारपेठेतील एका नामाकिंत को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यावरून सहीशिवाय २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी सोमवारी सायंकाळी बँकेत जाऊन धिंगाणा घातला. संतप्त झालेल्या एका ग्राहकाने बँकेवर दगडही फेकला. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शाखेत दाखल झालेल्या विभागीय व्यवस्थापकाने चार दिवसांत ग्राहकांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
या कर्मचाऱ्याने नोटबंदी काळात अनेक बड्या उद्योगपतींना साथ देत विश्वास संपादन केला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्या कर्मचाऱ्याने अनेकांना गंडा घातला आहे. एका उद्योगपतीची तब्बल पावणेदोन कोटी रुपये रक्कम त्याने बँकेतून काढून खर्च केली आहे. तर एका मृत व्यक्तीच्या नावे बँकेत असलेली पंधरा लाखांची ठेव हडप केली आहे.
दुसºया एका कर्जदाराने काढलेल्या आठ लाख रकमेपैकी चार लाख रुपये खात्यातून काढल्याचा मेसेज आला. त्या खातेदाराने बँकेत चौकशी केली असता त्या कर्मचाऱ्याने या रकमेची मला गरज होती म्हणून मीच काढली अशी कबुली देत रक्कम दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी निम्मी रक्कम देत वितरणपत्रावर सही घेतली. अशाप्रकारे तीस ते चाळीस खातेदारांच्या खात्यावरील सुमारे २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढली गेल्याचा अदांज आहे. ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
ज्या खातेदारांची रक्कम खात्यावरून कमी झाली आहे ते खातेदार चार दिवसांपासून बँकेत फेऱ्या मारत आहेत. काहींनी वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला. त्यामुळे बँकेचे विभागीय व्यवस्थापक बँकेत येऊन चौकशी करीत आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सोमवारी बँकेत धडक दिली. व्यवस्थापकांशी त्यांनी हुज्जत घातली. इतकी रक्कम एकच कर्मचारी कसा काय काढू शकतो? याला बँक व्यवस्थापन जबाबदार आहे. आमचे पैसे द्या, अशी मागणी त्यांनी केली.