सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:24 PM2024-07-22T16:24:37+5:302024-07-22T16:26:05+5:30

अनेक गावांचा संपर्क तुटला

20 dams filled up in Sindhudurg district, life disrupted due to heavy rains  | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

सिंधुदुर्गनगरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाचे बरसणे सुरूच आहे. जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तिलारी, कर्ली सातंडी, देवधर या प्रमुख धरणांतून २३ हजार लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २० धरणे पूर्णपणे भरली असून सध्या धरणांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले अनेक दिवस पावसाचे सातत्य असल्याने अनेक सकल भागांत पाणी साचून परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकजण यामुळे बाधित झाले असून कित्येकांना स्थलांतर करावे लागले आहे. अनेकांचा निवारा गेल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दिवसांपासून तर मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाच्या घाटांमध्ये दरड कोसळणे, महामार्गांवर, रस्त्यांवर झाडे कोसळणे, ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली जाणे यासारखे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. शासनाने एनडीआरएफची एक कमिटी जिल्हावासीयांच्या सेवेसाठी तैनात केली आहे.

धो-धो पडणाऱ्या पावसामुळे महत्त्वाच्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामधून १०६०० क्युसेक, तर तिलारी जलविद्युतमधून ९६८ क्युसेस पाणीविसर्ग सुरू आहे. कर्ली सातंडी धरणातील पाण्याचा विसर्ग ११०५० क्युसेकने सुरू आहे; तर देवधर धरणातून १३५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ३५ धरणप्रकल्पांपैकी २० धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे सध्या या धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी ७५ वर पोहोचली आहे.

२० धरणे १०० टक्के भरली

२० धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव, कारीवडे, तीथवली यांचा समावेश आहे. तर उर्वरित धरणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

Web Title: 20 dams filled up in Sindhudurg district, life disrupted due to heavy rains 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.