दौडमध्ये २०० स्पर्धक सहभागी

By admin | Published: December 9, 2014 08:18 PM2014-12-09T20:18:36+5:302014-12-09T23:21:31+5:30

स्वच्छता अभियान : वेंगुर्ला येथील स्पर्धेत आठ गटांचा भाग

200 contest participants in the race | दौडमध्ये २०० स्पर्धक सहभागी

दौडमध्ये २०० स्पर्धक सहभागी

Next

वेंगुर्ले : स्वच्छता अभियानांतर्गत शिवप्रेरणा प्रतिष्ठान व जागृती क्रीडा मंडळ वेंगुर्ले यांनी येथे आयोजित केलेल्या स्वच्छता दौड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आठ गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत २१० स्पर्धक सहभागी झाले होते.
श्रेयस काळसेकर, अप्रिता कदम, चिन्मय चौधरी, ऐश्वर्या मालवणकर, विपुल कदम, प्राजक्ता गावडे, शुभम तांडेल, सारिका वेंगुर्लेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅड. शाम गोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, सदस्य शेखर काणेकर, जागृतीचे अध्यक्ष संजय मालवणकर उपस्थित होते. पंच म्हणून जयराम वायंगणकर, जयवंत चूडनाईक, शेखर साळगावकर, बिराजदार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

स्पर्धेचा गटवार निकाल प्रथम तीन क्रमांकाप्रमाणे पुढीलप्रमाणे


४१० वर्षाखालील मुले - श्रेयस काळसेकर (भेंडमळा शाळा), श्रेयस गावडे (शिवाजी प्रागतिक), प्रतीक मालवणकर (वेंगुर्ले नं. १). १० वर्षाखालील मुली- अर्पिता कदम (वेताळ विद्यालय, तुळस), श्रावणी खानोलकर (भटवाडी नं. १), जिया अणसूरकर (भेंडमळा शाळा). १२ वर्षाखालील मुलगे- चिन्मय चौधरी (वेताळ हायस्कूल, तुळस), लवकुश प्रजापती, पवन कांबळे, कृष्णा निकम (तिन्ही शिवाजी प्रागतिक).
४१२ वर्षाखालील मुली : ऐश्वर्या माणगावकर (मदर तेरेसा), जानवी अणसूरकर (भेंडमळा शाळा), शीतल कोरगावकर, गौरी नाईक (दोन्ही वेताळ विद्यालय, तुळस).
४१४ वर्षाखालील मुले : विपुल कदम, महम्मद नदाफ (दोन्ही वेंगुर्ले नं. २), प्रबल बिराजदार (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन). १४ वर्षाखालील मुली- प्राजक्ता गावडे, नम्रता गावडे (दोन्ही वेंगुर्ले हायस्कूल) गंगा वालावलकर (वेंगुर्ले नं. ४).
४१७ वर्षाखालील मुले : शुभम तांडेल (शिरोडा हायस्कूल), शिवम घोगळे, सूरज मठकर (वेंगुर्ले हायस्कूल). १७ वर्षाखालील मुली- सरिका वेंगुर्लेकर, सिमरन शेख, शलाका गावडे (वेंगुर्ले हायस्कूल).

Web Title: 200 contest participants in the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.