दंडामुळे २२ कोटींची वसुली

By Admin | Published: April 16, 2015 11:24 PM2015-04-16T23:24:49+5:302015-04-17T00:04:27+5:30

खनिकर्मची कामगिरी : सर्वांत अधिक वसुली रत्नागिरी विभागाची

22 crores recovery due to penalty | दंडामुळे २२ कोटींची वसुली

दंडामुळे २२ कोटींची वसुली

googlenewsNext

रत्नागिरी : गौण खनिज बंदी उठविण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसुलातही वाढ झाली आहे. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीपोटी २२ कोटी ७७ लाख २७ हजार ३३ इतका महसूल मिळवत इष्टांकापेक्षा अधिक वसुली केली आहे. सर्वाधिक वसुली रत्नागिरी उपविभागाने (१७७ टक्के) केली आहे, तर तहसील स्तरावर खेड (१५० टक्के) अव्वल आहे.
येथील जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननातून गतवर्षी ९ कोटी ७३ लाख २२ हजार ८२५ इतका महसूल मिळवला आहे. यावर्षी या विभागाचे ७४.८६ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले. यात खेड तालुका आघाडीवर आहे.
पर्यावरण मंत्रालयाने २०११ सालापासून गौण खनिजावर बंदी घातली होती. त्यामुळे सर्वत्र गौण खनिजांचे उत्खनन बंद होते. याचा परिणाम प्रशासनाच्या महसुलावरही झाला. लिलावच न झाल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते. गतवर्षी केवळ ९ कोटी ७३ लाख २२ हजार ८२५ (७४ टक्के) इतकाच महसूल मिळाला होता. खनिकर्म विभागाला २० कोटींचे उद्दिष्ट कमी करून १३ कोटी इतके देण्यात आले होते. मात्र, तेही केवळ ७५ टक्केच झाले होते. या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयासह, पाच उपविभाग तसेच तहसील स्तरावरही उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला सहा कोटींचे, उपविभागीय कार्यालयांना प्रत्येकी दीड कोटींचे, तर तहसील कार्यालयांना प्रत्येकी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
मार्च २०१५ पर्यंत केलेल्या या वसुलीत खेड तालुक्याने अव्वल स्थान राखले आहे, तर सर्वांत कमी वसुली गुहागर तालुक्यातून (४७ टक्के) झाली आहे. तसेच खेडवगळता सर्वच उपविभागानी इष्टांकापेक्षाही अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे. यात रत्नागिरी उपविभाग अव्वल असून, १७७ टक्के वसुली झाली आहे. राजापूर उपविभागाची १७५ टक्के वसुली झाली आहे. गौण खनिजावरील बंदी उठल्यानंतर मात्र, सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येत आहे. मार्च महिन्यात मोहीम राबवल्याने या एकाच महिन्यात जिल्ह्यात ३ कोटी ३१ लाख ११ हजार ३३२ रुपये इतकी वसुली झाली आहे.
वाळूवरील बंदी २०११ सालापासून कायम आहे. लिलावही थांबले आहेत. या साऱ्यात खनिकर्मची कामगिरी महत्वाची आहे. (प्रतिनिधी)


मार्च २०१५ अखेर केलेली वसुली
उपविभाग उद्दिष्टवसुली
खेड एक कोटी८६,०७,३७५
रत्नागिरी दीड कोटी२,६५,९८,८७८
चिपळूण दीड कोटी१,७०,३३,२०७
दापोली दीड कोटी१,६१,९०,१४८
राजापूर दीड कोटी२,६३,१४,५५६
तहसील स्तर
मंडणगड १ कोटी७६,६९,८२७
दापोली १ कोटी६५,०९,८४३
खेड १ कोटी१,५०,४३,५५८
चिपळूण १ कोटी८९,६०,९२६
संगमेश्वर १ कोटी१,०६,२३,५९२
गुहागर १ कोटी४६,८०,७०७
रत्नागिरी १ कोटी७७,६२,७२३
राजापूर १ कोटी१,०८,०३,१९९
लांजा १ कोटी१,०८,२८,१२९
जिल्हाधिकारी कार्यालय६ कोटी५,०१,००,५६५
एकूण २२ कोटी २,७७,२७,०३३


गौणखनिजावरील बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्यातील महसुलात वाढ झाल्याचे स्पष्ट होत असताना महसूलकडे तालुकास्तरावर खेडमध्ये १५० टक्के वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च २०१५पर्यंत झालेल्या उद्दिष्टपूर्तीत खनिकर्म विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या वसुलीपोटी मोठा महसूल उपलब्ध झाला आहे.

Web Title: 22 crores recovery due to penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.