देवगडमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, २ महिलेसह सहा जण ताब्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात २२ कोटींची किंमत
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 22, 2022 07:35 PM2022-09-22T19:35:31+5:302022-09-22T19:44:26+5:30
२२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला
देवगड (सिंधुदुर्ग) : व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमांविरुध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचेकडून कारवाई करण्यात आली. देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून ४ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड या ठिकाणी व्हेल माशाची उल्टी (अंबरप्रोस) याची तस्करी होणार असल्याची माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहिती खातरजमा करुन कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदिप भोसले यांनी दिले.
त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकरी व अंमलदार यांच्या पथकाने देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून ४ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दराप्रमाणे व्हेल माशाच्या उल्टी सदृश्य पदार्थाची किंमत २२,३७,००, ००० इतकी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
६ आरोपीकडून व्हेल माशाची उल्टी सदृश्य, एक चारचाकी व एक दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आलेले आहे. नमूद आरोपीविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजिव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा तपास पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, अनिल धूरी, प्रमोद काळसेकर, रुपाली खानोलकर, अमित तेली, संकेत खाइये, रवि इंगळे, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.