सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२.२६ मि. मि. सरासरी पाऊस
By admin | Published: July 12, 2017 05:23 PM2017-07-12T17:23:22+5:302017-07-12T17:23:22+5:30
कोर्ले- सांतडी पाणलोट क्षेत्रात २१ मि.मि. पाऊस
सिंधुदुर्गनगरी दि. १२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २२.२६ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १२00.४५ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय पाऊस
दोडामार्ग- ३८, सावंतवाडी २२, वेंगुर्ला- १८.0४, कुडाळ -१८, मालवण -११, कणकवली -३२, देवगड- १, वैभववाडी ३८.
कोर्ले- सांतडी पाणलोट क्षेत्रात २१ मि.मि. पाऊस
कोर्ले-सातंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २१ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत ९५६ मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात २५.५६४0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १६.८0 मि.मी. एकूण पाऊस १५१६.२0 मि.मि. देवघर १५.५0 मि.मि. एकूण पाऊस ११00.७0 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे २८६.५0२0 द.ल.घ.मी व ५४.७८१0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.