व्हेल उलटीच्या तस्करी प्रकरणी सांगलीतील एकासह नऊ जणांवर गुन्हे दाखल

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 18, 2023 11:20 AM2023-03-18T11:20:04+5:302023-03-18T20:31:04+5:30

संशयितांकडे कसून चौकशी सुरू

25 crore worth of whale vomit seized, 9 suspects detained in Malvan Sindhudurga | व्हेल उलटीच्या तस्करी प्रकरणी सांगलीतील एकासह नऊ जणांवर गुन्हे दाखल

व्हेल उलटीच्या तस्करी प्रकरणी सांगलीतील एकासह नऊ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

मालवण: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (एलसीबी ) शुक्रवारी मालवण तालुक्यातील मसुरे - मसदे मार्गावरील वेरळ माळरानावर सापळा रचून केलेल्या कारवाईचा तपास आता मालवण पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणी सांगली, इस्लामपुर येथील एका सह ताब्यात घेण्यात आलेल्या ९ जणांवर वन्य जीव अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

 व्हेलंच्या उलटीची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने मसदे - मसुरे मार्गांवर शुक्रवारी सापळा लावला. यावेळी ओमनी व इको अशा दोन कार त्याठिकाणी येऊन थांबल्यावर त्यांच्यावरील संशयाने एलसीबी पथकाने दोन्ही गाड्यांची झडती घेतली असता ओमनी गाडीत १२ किलो ५२८ ग्रॅम व इको गाडीत ११ किलो ४३६ ग्रॅम वजनाची व्हेलंची उलटी सदृश्य पदार्थ (अंबरग्रीस ) सापडून आला. 

याप्रकरणी अंबरग्रीससह दोन कार, एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले असून तुषार चंद्रकांत घाडी वय ३२, भरणी घाडीवाडी कणकवली, बजरंग आत्माराम कदम वय ५४ सांगली. सतीश शांताराम मोरे वय ५४ भाईंदर ठाणे. अजित नारायण घाडीगांवकर वय४६ कळसुली कणकवली, अनिकेत प्रकाश चव्हाण वय ३२ मसुरे गडघेरावाडी. शशांक प्रकाश चव्हाण ३४ तरेळे कणकवली.  हेमंत अशोक मेथर वय ४९ कोळंब, पांडुरंग चंद्रकांत राणे वय ३८ मसुरे, प्रवीण चंद्रकांत भोई वय ३५ कुडाळ अशा ९ जणांना ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणी वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ या कायद्या अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत आणखी तपास करण्यात येत आहे. या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस निरीक्षक आर. बी. शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकाँस्टेबल अनिल धुरी, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, काँस्टेबल प्रथमेश गावडे, यश आरमारकर, रवी इंगळे, चंद्रहास नार्वेकर, चंद्रकांत पालकर हे सहभागी झाले होते.

Web Title: 25 crore worth of whale vomit seized, 9 suspects detained in Malvan Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.