डिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:29 AM2019-03-04T10:29:40+5:302019-03-04T10:31:02+5:30
डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला. ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
बांदा : डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला. ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
या आगीत विजय गोपाळ सावंत, लवू रामचंद्र सावंत, सोंडो भिवा सावंत, लक्ष्मण सुरेश सावंत, रामा शंभू सावंत या शेतकऱ्यांची सुमारे २५० काजू कलमे जळून खाक झाली.
शनिवारी दुपारी आपल्या बागायतीमधील काम आटोपून बहुतांशी शेतकरी जेवणासाठी गेले होते. बागायतीमधून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बंबाद्वारे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक एल. एस. परब, कृषी सहाय्यक रुपाली पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप धुरी, प्रितम कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
डिंगणे सरपंच जयेश सावंत, दिनेश सावंत, शंकर सावंत, फटू सावंत, संतोष नाईक, तनय नाईक, राजू सावंत, शिवराम सावंत, यशवंत सावंत, ऋषिकेश सावंत, रवींद्र सावंत, महादेव सावंत, मनोज सावंत, तुषार सावंत, सुहासिनी सावंत, प्रगती सावंत, शुभम सावंत, विश्वास सावंत यांनी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले.