१३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

By admin | Published: May 22, 2015 10:13 PM2015-05-22T22:13:37+5:302015-05-23T00:34:55+5:30

मजूर सहकारी संस्थेसाठी आज निवडणूक, सायंकाळी मतमोजणी

26 candidates are in the fray for 13 seats | १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

१३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील मजूर सहकार संस्थांच्या संघ फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी होत असून मजूर संघाच्या १३ जागांसाठी एकूण २६ उमेदवार आपले भवितव्य अजमावणार आहेत. सकाळी ८ ते ४ या वेळेत माध्यमिक पतपेढी ओरोस येथे मतदान होणार आहे तर तेथेच ५ वाजता मतमोजणी होणार आहे.
मजूर सहकार संघाची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी होत असून विद्यमान अध्यक्ष बाबा आंगणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत श्रमसंकल्प पॅनल आणि सर्वपक्षीय समावेश असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली मजूर वैभव पॅनल यामध्ये ही दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.
या निवडणुकीसाठी १३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये कणकवली ३०, कुडाळ २५, मालवण २३, सावंतवाडी २०, वैभववाडी १४, वेंगुर्ला १३, देवगड ९ आणि दोडामार्ग तालुक्यात ५ संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर २६ उमेदवारांचे भवितव्य सिलबंद करणार आहेत.
महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी साक्षी हेमंत बागवे आणि श्रद्धा विलास गावकर (काँग्रेस आघाडी), रक्षदा राजेंद्र सावंत आणि रसिका राजन धुरी (मजूर वैभव), इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी रंजन बाळकृष्ण चिके (मजूर वैभव) आणि केशव बाबुराव बेळणेकर (काँग्रेस आघाडी) यांच्यामध्ये लढत आहे. भटक्या विमुक्त जमातीतील एका जागेसाठी प्रकाश रामचंद्र पवार (मजूर वैभव) आणि रामचंद्र जनार्दन जंगले (काँग्रेस आघाडी) यांच्यात लढत आहे. अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी आत्माराम सोमा ओटवणेकर (काँग्रेस आघाडी) आणि दत्ताराम राजाराम कसालकर (मजूर वैभव) यांच्यात लढत होणार आहे.
खुल्या प्रवर्गातील ८ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून काँग्रेस आघाडीतर्फे लक्ष्मण आंगणे, अनिल गोपाळ गडकर, गजानन गावडे, रघुनाथ वसंत गावडे, संतोष मनोहर परब, सुनील रामचंद्र भोगले, श्रीकांत चंद्रकांत राणे, संदीप रमाकांत सावंत हे निवडणूक लढवत आहेत. तर मजूर सहकार वैभव पॅनलतर्फे संभाजी साटम, दत्ताराम पेडणेकर, अच्युत गावडे, आत्माराम बळीराम बालम, राजाराम हरिश्चंद्र पालव, अरूण गुणाजी सावंत, तुळशीदास रावराणे, प्रशांत नामदेव सावंत हे लढत देत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे तर चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपताच तासाभरात त्याच ठिकाणी व त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)

काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र
या निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार तर दुसरीकडे नाराज सदस्यांनी विरोधकांच्या साथीने तयार केलेले मजूर वैभवचे उमेदवार अशी दुरंगी लढत होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. तर निवडणूक निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Web Title: 26 candidates are in the fray for 13 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.