जिल्ह्यात २६ हजार कोव्हीड लस विनावापर पडून -नितेश राणेंचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 02:06 PM2021-03-18T14:06:46+5:302021-03-18T14:16:48+5:30
Corona vaccine NiteshRane Sindhudurg- सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे . संसदेत शिवसनेचा गटनेता असलेल्या खासदार विनायक राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत ? पालकमंत्री , जिल्हाधिकारी , आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार ? असा सवाल आमदार नितेश राणेंनी केला आहे.
Next
ठळक मुद्देराज्यात उपलब्ध ५३ लाख लसीपैकी फक्त २३ लाख लसीकरणसिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजारपैकी केवळ १४ हजार लसीकरण
कणकवली : एकीकडे महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा आहे असे पंतप्रधानांकडे रडगाणे राज्यशासन गात आहे. तर राज्याला मिळालेल्या ५३ लाख लसिंपैकी फक्त २३ लाख लसीकरण झाले असून उर्वरित ३० लाख लसीकरण केव्हा करणार ? सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे . संसदेत शिवसनेचा गटनेता असलेल्या खासदार विनायक राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत ? पालकमंत्री , जिल्हाधिकारी , आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार ? असा सवाल आमदार नितेश राणेंनी केला आहे.
Correction: 17 k cases in Maharashtra today and more than 1 k cases in mumbai
— nitesh rane (@NiteshNRane) March 16, 2021
कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात गुरुवारी आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले, आधी शिल्लक राहिलेल्या लसीचे काय ते नियोजन करा आणि त्यानंतरच लसीची मागणी करा. सिंधुदुर्गात शिल्लक असलेले २६ हजार कोव्हिड लसीकरण कधि करणार ? असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला .
ते म्हणाले, होळी सणासाठी चाकरमानी जिल्ह्यात आल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास राज्यातील सत्ताधारी केंद्रावर ठपका ठेवणार आहेत. पण उपलब्ध करून दिलेली लस कधी वापरात आणणार ? याचे काहीच नियोजन नाही, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले .