जिल्ह्यात २७१५ अधिकारी नियुक्त
By admin | Published: June 19, 2015 11:49 PM2015-06-19T23:49:07+5:302015-06-19T23:49:07+5:30
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण : ४ जुलैला होणार कार्यवाही
गिरीश परब -q सिंधुदुर्गनगरी
राज्यात शाळाबाह्य मुले असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४ जुलै रोजी एकाच दिवशी करण्यात येणाऱ्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी २७१५ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील तब्बल २ लाख ९ हजार ८३९ कुटुंबांच्या सर्वेक्षणामधून शाळाबाह्य मुलांची माहिती घेण्यात येणार आहे.
६ ते १४ वयोगटातील एकही बालक शिक्षणामुळे वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तरीसुद्धा राज्यात शाळाबाह्य मुले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यात एकाच दिवशी म्हणजे ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकाग्रामीणशहरीसर्वेक्षण झोनल नियंत्रण
कुटुंबसंख्याकुटुंबसंख्याअधिकारीअधिकारीअधिकारी
दोडामार्ग१२०६५-१५५१०१
देवगड२७८००-३३६२०१
कणकवली२७८६४६०६६४१३२२१
कुडाळ३४१२७४००१४५७२५१
मालवण२४३०४४६२०३४६६२०१
सावंतवाडी२७१५४८८०४४२५२२१
वैभववाडी११५४५-१४७१०१
वेंगुर्ला१८३७२३१४७२६४१५१
+ २५० राखीव
एकूण१८३२०१२६६३८२५६३१४४८
...असे होणार सर्वेक्षण
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक केलेले सर्वेक्षण अधिकारी, झोनल अधिकारी व नियंत्रण अधिकारी ४ जुलैपासून सकाळी सर्वेक्षणास सुरुवात करणार आहेत. निवडणूक मतदान प्रक्रियेप्रमाणे ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या बोटाला शाई लावून सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे व त्याचा अहवाल तत्काळ शासनास सादर करण्यात येणार आहे.