२८व्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याला पाच सुवर्ण

By admin | Published: December 12, 2014 09:56 PM2014-12-12T21:56:02+5:302014-12-12T23:40:42+5:30

कीकबॉक्सिंग स्पर्धा : आता राष्ट्रीय स्पर्धेकडे जिल्ह्यातील खेळाडूंचे लक्ष..

In the 28th state-level competition, five golds in the district | २८व्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याला पाच सुवर्ण

२८व्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याला पाच सुवर्ण

Next


चिपळूण : आनंद गुरुकुल, वाघोली - पुणे येथे झालेली २८व्या राज्यस्तरीय कॅडेट व सिनिअर कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्याने ५ सुवर्ण, ५ रौप्य व १२ कांस्य पदकांची कमाई करुन महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले.
बारा वर्षांखालील मुलांमध्ये ३२ किलो वजनी गटात संकेत भोसले याला रौप्य, ४२ किलो वजनी गटात नील वेल्हाळ याला कांस्य, ४७ किलो वजनी गटात अथर्व सुर्वे याला कांस्य, तर १५ वर्षांखालील मुलींमध्ये पॉर्इंट फाईट प्रकारात ४६ किलो वजनी गटात नीशा गमरे हिला कांस्य, लाईट कॉटॅक्ट प्रकारात ४२ किलो वजनी गटात प्रथमेश खरे याला कांस्य, १९ वर्षाखालील पुरुष व महिलांमध्ये पॉर्इंट फाईट प्रकारात ६९ किलो वजनी गटात चेतन सोलकर याला कांस्य, महिलांमध्ये ४० किलो वजनी गटात सेजल आंब्रे हिला कांस्य, ४५ किलो वजनी गटात चांदणी झा हिला कांस्य, ६५ किलो वजनी गटात योगिता खाडे हिला सुवर्ण, लाईट काँटॅक्ट प्रकारात ५७ किलो वजनी गटात अक्षय चव्हाण याला सुवर्ण, ६९ किलो वजनी गटात विकीकुमार सिंग याला सुवर्ण, ४० किलो वजनी गटात सांभवी मयेकर हिला सुवर्ण, ४५ किलो वजनी गटात प्रियांका वरक हिला कांस्य, ५० किलो वजनी गटात रसिका माने हिला कांस्य, फुल कॉटॅक्ट प्रकारात ५१ किलो वजनी गटात मंदार साळवी याला रौप्य, ६७ किलो वजनी गटात प्रतीक मोहिते याला कांस्य, के-१ प्रकारात ५१ किलो वजनी गटात स्वप्नील आग्रे याला सुवर्ण, लो-कीक प्रकारात ५४ किलो वजनी गटात चेतन घाणेकर याला कांस्य, कीक लाईट प्रकारात ४५ किलो वजनी गटात हर्षद भोसले याला रौप्य, ५४ किलो वजनी गटात सौरभ सकपाळ याला कांस्य, ४५ किलो वजनी गटात सुवर्णा कदम हिला रौप्य अशा विविध पदकांची कमाई केली.
तसेच आदित्य शिंदे, राज कदम, सूरज खरात, साहील मिंडे, यश कदम, रजत बाईत, विनायक साळवी, सुशील अरमरे, अक्षय पडवेकर, रुपेश मोरे, लतेश आग्रे, सूरज नाचरे, अभिषेक गोरीवले, हुजैफा ठाकूर, विनोद राऊत, मीलन ठाकूर, मृण्मयी साळुंखे, पूजा पाटील व स्नेहल महाडिक यांनी चांगला खेळ केला. दि. १७ ते २१ डिसेंबर रोजी फरिदाबाद, हरियाणा येथे होणाऱ्या कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप राष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे. खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षक योगिता खाडे, चेतन घाणेकर, प्रणित सावंत, हुजैफा ठाकूर, प्रतीक मोहिते, विनोद राऊत, मंदार साळवी व शर्मिला फुटक यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)

जिल्ह्याने ५ सुवर्ण, ५ रौप्य व १२ कांस्य पदकांची कमाई करुन महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले.
कीकबॉक्सिंग चॅम्पियनशीप राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
यशस्वी होऊन परतण्याचा इरादा.

विजयी संघाला प्रशिक्षक योगिता खाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्राचे सचिव बापू घुले, उमर मुक्तियार आदी उपस्थित होते.

Web Title: In the 28th state-level competition, five golds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.