शासनाची कर्जमाफी : देवगड तालुक्यात ९ हजार शेतक-यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:35 PM2020-01-01T20:35:16+5:302020-01-01T20:36:28+5:30

तर दोन लाखांहून अधिक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या दोन हजारांहून जास्त आहे. देवगड तालुक्यातील सुमारे १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती आंबा बागायतीची नोंद आहे. यामधील १५ हजारांहून अधिक शेतकरी, बागायतदार आंबा व्यवसाय करतात.

3,000 farmers benefit in Devgad taluka | शासनाची कर्जमाफी : देवगड तालुक्यात ९ हजार शेतक-यांना लाभ

शासनाची कर्जमाफी : देवगड तालुक्यात ९ हजार शेतक-यांना लाभ

Next
ठळक मुद्दे३७ कोटी, ७५ लाखांचे एकूण कर्ज माफ होणार

अयोध्याप्रसाद गावकर । 

देवगड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांना २ लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकºयांचा सातबारा कोरा होत नसला तरी शेतक-यांची २ लाखापर्यंत होणारी कर्जमाफी ही त्यांना दिलासा देणारी आहे. या घोषणेमुळे देवगड तालुक्यात सुमारे ९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तालुक्यात ३७ कोटी ७५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होऊ शकते.

देवगड तालुक्यात विशेषत: आंबा पिकासाठी कर्जे जास्त प्रमाणात घेण्यात आली आहेत. बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक  व जिल्हा बँक या बँकांमधून येथील शेतक-यांनी सर्वाधिक प्रमाणात कर्जे घेतली आहेत. तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांमधूनही शेतकºयांनी २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शेतीकर्ज व आंबा पीक कर्ज घेतली आहेत. 

विशेषत: विजयदुर्ग, पडेल, वाडा, देवगड, तळेबाजार, मिठबांव, शिरगांव या बँक आॅफ इंडियाच्या शाखांमधून सुमारे चार हजार शेतकºयांनी आंबा पीक कर्जे घेतली आहेत. 

विशेषत: एक लाखापर्यंत सुमारे तीन हजार दोनशे शेतकºयांनी कर्जे घेतली आहेत तर एक लाख ते एक लाखाच्यावरती ८०० हून अधिक शेतक-यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तालुक्यातील विविध शाखांमधूनही बहुतांश शेतकºयांनी आंबा पीक व शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. या बँकेच्या शाखांमधून ५० हजारापर्यंत बिनव्याजी कर्जे अनेक शेतक-यांनी घेतली आहेत. 

तालुक्यातील ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतक-यांची संख्या सुमारे ५ हजार आहे तर एक लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतक-यांची संख्या सुमारे २ हजार इतकी आहे. 

तर दोन लाखांहून अधिक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या दोन हजारांहून जास्त आहे. देवगड तालुक्यातील सुमारे १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती आंबा बागायतीची नोंद आहे. यामधील १५ हजारांहून अधिक शेतकरी, बागायतदार आंबा व्यवसाय करतात. 

 

  • आंबा व्यवसायावर देवगडची आर्थिक नाडी

सर्वाधिक कृषी कर्जाचे वितरण देवगड तालुक्यात केले जाते. तालुक्यामध्ये सर्वाधिक आंबा बागायतदार असून हे आंबा बागायतदार पीक कर्ज दरवर्षी घेत असतात.  इतर तालुक्यांमध्ये मत्स्य व लघु उद्योगावरती कर्ज जास्त प्रमाणात असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच देवगड तालुका हा आंबा तसेच मत्स्य व्यवसायावरती विशेषत: अवलंबून आहे. या दोन्ही व्यवसायांवरती तालुक्याची आर्थिक नाडी अवलंबून आहे.

Web Title: 3,000 farmers benefit in Devgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.