‘त्या’अधिकाऱ्यांना ३१ ची ‘डेडलाईन’
By admin | Published: December 22, 2016 12:41 AM2016-12-22T00:41:21+5:302016-12-22T00:41:21+5:30
प्रशासनाकडून अंतिम नोटीस :
सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयातील पाच तज्ज्ञांचा समावेश प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवेत रुजू झालेले तज्ज्ञ डॉक्टर दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्याने रूग्णालयीन सेवा वर्षभर विस्कळीत झाली. वर्षाच्या अखेरीस शेवटी प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर पर्यंत हजर राहण्याचा अंतीम आदेश काढले आहेत. हजर न राहील्यास सेवेतून कमी करण्यात येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयातील रिक्तपदे भरण्याचा प्रश्न निकालात निघून आगामी नववर्षात रूग्णांना उत्तम सेवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत १६ तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असून, त्यानुसार शासनाने तज्ज्ञ डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. मात्र, यातील अनेक अधिकारी वारंवार दिर्घ मुदतीच्या रजेवर राहीले होते. त्यामुळे यातील दोन डॉक्टरांना सेवेतून कमी केलेले आहे. सद्या रुग्णांच्या सेवेसाठी शासनाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत १४ डॉक्टरांची रुग्णालयात आवश्यकता असून सर्वसामान्य रुग्णांना हा दवाखाना म्हणजे मुख्याध्यार आहे. मात्र, या रुग्णालयात फक्त पाच डॉक्टर कार्यरत असून, तेच दिवसरात्र आपली सेवा बजावत आहे. यामध्ये रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. बी. एन. पितळे, डॉ. अभिजित चितारी, डॉ. संदीप सावंत रुग्णाच्या सेवेसाठी सद्यस्थितीत हजर असून या डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर डॉ. के. के. देशपांडे हे रजेवर असून, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे व डॉ. निवेदिता तळणकर यांची प्रतिनियुक्ती दोडामार्ग येथे झाली आहे. डॉ. एस. आर. पाटील हे आपल्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. मात्र, डॉ. असिफ सय्यद हे सात महिने अनुपस्थित, डॉ. गुलसितान सय्यद चौदा महिने, डॉ. एस. व्ही. मांगलेकर दोन वर्षे, डॉ. एस. के. भंडारे व डॉ. एन. एम. ढोबळे हे सुमारे चार वर्षे अनुपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे केवळ पाच ते सहा डॉक्टरांवर अवलंबून आहे. तर रुग्णालयात अन्यही डॉक्टरांची तितकीच आवश्यकता आहे. मात्र, ते डॉक्टर हजर नसल्याने अनेक रुग्णांचे सेवेअभावी हाल होत आहे. त्यामुळे दीर्घकाळ अनुपस्थित असलेल्या या डॉक्टरांना ३१ डिसेंबर पूर्वी सेवेत रुजू होण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ३१ डिसेंबरपूर्वी हजर न राहिल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा आदेशपत्रामध्ये दिला आहे. जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांपेक्षा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रोज तपासणीसाठी शेकडो रग्ण दाखल होत असतात. मात्र आवश्यक तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी नसल्याने या रूग्णांच्या आजाराने निश्चितीकरण होत नाही. एकंदरीत तज्ज्ञ अधिकाऱ्यांमुळे जनतेला चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. रिक्तपदांबाबत : जिल्हावासीयांना अपेक्षा, गोवा राज्याचा आधार आरोग्यमंत्री दीपक सावंत हे जिल्ह्याचे सुपूत्र आहेत तर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शहरातीलच या उपजिल्हा रूग्णालयाची अवस्था अधिकाऱ्यांअभावी गंभीर बनली आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहून रुग्णालयाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण या नामदारांनी सोडविण्याची आशा जिल्हावासियांना लागून राहिली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तालुकापूर्तीच मर्यादित नसून, जिल्हाभरातून रुग्ण दाखल होत असतात. यामध्ये अपघातग्रस्त रुग्णांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मात्र, अस्थिव्यंग तज्ज्ञ व कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांची पदे गेली कित्येक वर्षे रिक्तच असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा राज्यातील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. अनुपस्थित असलेल्या डॉक्टरांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातर्फे पाच ते सहा वेळा सेवेत रुजू होण्याचे लेखी पत्र पाठविलेले आहे. मात्र, अद्यापही दीर्घकाळ अनुपस्थितीत असलेले डॉक्टर हजर होत नसल्याने शासनानेच सेवा समाप्तीचा निर्णय घेतला आहे. - उत्तम पाटील, वैद्यकीय अधीक्षक