सिंधुदुर्गातील ३१५ शेतकऱ्यांना लागली लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 PM2021-03-04T16:48:29+5:302021-03-04T16:50:54+5:30
Farmer Sindhudurgnews- शेतकरी योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ७ हजार ७७८ अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आले होते. यातील लाभार्थी निवड कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ३१५ शेतकऱ्यांना यात लॉटरी लागली आहे. एक कोटी ५६ लाख ६३ हजार ४०० रुपये एवढ्या किमतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ओरोस : शेतकरी योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ७ हजार ७७८ अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आले होते. यातील लाभार्थी निवड कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ३१५ शेतकऱ्यांना यात लॉटरी लागली आहे. एक कोटी ५६ लाख ६३ हजार ४०० रुपये एवढ्या किमतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ह्यएकाच अर्जाद्वारेह्ण देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित विविध बाबींकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत. राज्य शासनाने महा-डीबीटी पोर्टलद्वारे राज्यातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने शेतकरी योजना अंतर्गत योजना लाभासाठी अर्ज मागविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ७ हजार ७७८ शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते. सोडतीमध्ये जिल्ह्यातील ३१५ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. ७ हजार ४६३ शेतकऱ्यांना ही लॉटरी लागलेली नाही.
शासनाकडून मिळणार अनुदान
यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत असलेल्या योजनांसाठी जिल्ह्यातील २१९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे यासाठी ९७ लाख १५ हजार ४०० रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य योजना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत असलेल्या योजनांसाठी ५३ लाभार्थ्यांना लॉटरी लागली आहे. यासाठी २७ लाख १३ हजार अनुदान मिळणार आहे, तर महाराष्ट्र फलोत्पादन अभियान अंतर्गत असलेल्या योजनांसाठी ४३ लाभार्थ्यांना लॉटरी लागली आहे. यासाठी ३२ लाख ३५ हजार एवढे अनुदान मिळणार आहे.