विकासकामांचा ३३ कोटी निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2015 11:29 PM2015-06-25T23:29:07+5:302015-06-25T23:29:07+5:30

जिल्हा परिषद वित्त समिती सभा : निधी खर्च न झाल्याचे स्पष्टीकरण द्या

33 crore fund of development works | विकासकामांचा ३३ कोटी निधी अखर्चित

विकासकामांचा ३३ कोटी निधी अखर्चित

Next

सिंधुदुर्गनगरी : विविध विकासकामांवर खर्च करण्यासाठी १३ व्या वित्त आयोगामार्फत प्राप्त झालेला ९१ कोटी ४९ लाख रूपयांपैकी तब्बल ३२ कोटी ८४ लाख एवढा निधी अद्यापही अखर्चित आहे. ३० सप्टेंबर २०१५ पूर्वी हा निधी खर्च न झाल्यास शासनास परत करावा लागणार असून निधी खर्च न झाल्याचे स्पष्टीकरणही द्यावे लागणार असल्याची माहिती जिल्हा वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी दिली.जिल्हा परिषदची वित्त समितीची सभा सभापती संजय बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवण, भगवान फाटक, सुभाष नार्वेकर, समिती सचिव तथा वित्त अधिकारी मारूती कांबळे, अधिकारी, प्रमुख उपस्थित होते.आॅगस्ट २०१० ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी ९१ कोटी ३९ लाख ५३ हजार एवढा निधी मंजूर झाला होता. या निधीचे जिल्हा परिषद स्तरावर ११ कोटी, पंचायत समिती स्तरावर १८ कोटी २४ लाख ३८ हजार, यापैकी १३ कोटी ६० लाख ७४ हजार खर्च झाला आहे. ४ कोटी ६५ लाख अखर्चित आहे. तर ग्रामपंचायत स्तरावर ६२ कोटी ७ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ३७ कोटी १९ लाख एवढा खर्च झाला असून २४ कोटी ८८ लाख एवढा निधी अखर्चित राहिला आहे.
असा एकूण सुमारे ५८ कोटी रूपये निधी खर्च झाला असून अद्यापही ३२ कोटी ८४ लाख ६५ हजार एवढा निधी अखर्चित आहे. हा निधी सप्टेंबरपूर्वी खर्च होणे बंधनकारक आहे.
यात ग्रामपंचायत विभागाचा अखर्चित निधी मोठ्या प्रमाणात राहिला आहे. हा निधी वेळेत खर्च न झाल्यास शासनास परत करावा लागणार आहे. तसेच निधी अखर्चाबाबतचे स्पष्टीकरणही द्यावे लागणार आहे.
पाणीटंचाईच्या मंजूर कामापैकी ७ ते ८ कामे संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ती रखडली आहेत. या कामांना ३० जूनपर्यंत मुदत आहे. तेव्हा यापुढे कागदपत्रांची पूर्तता होऊन पावसात ही कामे करणे शक्य होणार नसल्याची माहिती सभागृहात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली.(प्रतिनिधी)

१०० टक्के निधी खर्च झालाच पाहिजे
सिंधुदुर्ग जि. प. ला विविध योजनेंतर्गत प्राप्त होणारा निधी व थेट शासनाकडून मिळणारा निधी १०० टक्के खर्च करण्याचे नियोजन प्रत्येक विभागाने आतापासूनच सुरू करा. कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के निधी खर्च झालाच पाहिजे असे आदेशही सभापती संजय बोंबडी यांनी दिले आहेत.


गावठी कोंबड्यांच्या पिल्लांचे वाटप करा
४जि. प. पशुसंवर्धन विभागामार्फत कोंबडीची पिल्ले पुरविणे योजनेंतर्गत देण्यात येणारी कोंबडीची पिल्ले ही निरागस जातीची देऊ नये, या कोंबड्यांना मागणी नाही. त्यामुळे गावठी कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करावे, अशी सूचना यावेळी सदस्य सुरेश ढवण यांनी केली.

Web Title: 33 crore fund of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.