जिल्ह्यात ३६,३६२ बेरोजगार
By admin | Published: July 15, 2016 10:25 PM2016-07-15T22:25:26+5:302016-07-15T22:36:16+5:30
‘एम्प्लॉयमेंट’चे रूपांतर : ‘प्रमोद महाजन अभियानां’तर्गत प्रशिक्षण; रोजगार निर्मितीसाठी ‘कौशल्य विकास केंद्र’
रामचंद्र कुडाळकर -- तळवडे --सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगधंदे निर्माण करून रोजगार पुरविण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींमार्फत दाखविले जाते; पण प्रत्यक्षात काहीच कृती केली जात नाही. परिणामी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची परिस्थिती भयावह असून ही संख्या ेसध्या ३६,३६२ एवढी नोंद झाली आहे. एम्प्लॉयमेंट कार्यालयाचे रूपांतर झालेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार निर्मिती करण्याची अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
प्रशासनामार्फत सुशिक्षित बेरोजगारांची नोंद करण्यासाठी एम्प्लॉयमेंट कार्यालय असते. जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांची आकडेवारीची याठिकाणी नोंद होते. शासनाने महा-ई सेवा केंद्रांतर्गत एम्प्लायमेंट कार्ड काढण्याची सुविधा दिली आहे. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार, उद्योगधंदे निर्माण करण्याचे वारंवार आश्वासन दिले. पण ज्यावेळी हे रोजगार निर्माण होतात त्यावेळी ही पदे पात्रतेने कमी आणि वशिल्याने जादा भरली जातात. त्यामुळे या कार्यालयाचे महत्व कमी झाले होते. याचबरोबर न्यायालयाच्या निर्णयानुसार एम्प्लॉयमेंट कार्यालयामार्फत करण्यात येणारी नोकर भरतीही संबंधीत खात्याने स्वतंत्ररित्या भरण्याचे आदेश दिले आहेत.
परिणामी हे कार्यालय निर्माण झालपासूनच ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा पद्धतीचे आहे. अलिकडे या कार्यालयाचे रूपांतर आता 'जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा'त झाले आहे. त्यानुसार आता रोजगाराचे नवनवे उपक्रम राबविण्यात येणार असून गरजू संस्थांनी आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर संस्थांना शासनाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सद्या जिल्ह्यातील ३६, हजार ३६२ बेरोजगारांची नोंदणी या कार्यालयात झाली असून यात इंजिंनीअर, पदवीधर, अॅग्रीकल्चर, मॅनेजमेंट, वकिल, दहावी, बारावी व आयटीआय यांचीही नोंद आहे. तर नोंद नसलेले अनेक बेरोजगारही आहेत.
एम्प्लॉयमेंट कार्यालयाचे रूपांतर केल्याने कार्यालयाची कामाची व्याप्ती वाढविली असून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजना सुरू केलेली आहे.
या अंतर्गत प्रशिक्षण फक्त महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सूचीबध्द झालेल्या संस्थांमार्फत प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. या जिल्ह्यातील संस्था सावंतवाडी तालुक्यात एम्पायर नॉलेज अॅण्ड स्किल, पुणे शाखा सावंतवाडी-प्रविण हजारे ९४२२९१८३९२ या ठिकाणी एरर (ए’्रूी३१ङ्मल्ल्रू) कोर्स, वेंगुर्ले तालुका-स्टेम लर्निंग प्रा. लि. बोरिवली मुंबई शाखा-प्रणाली अंधारी (०२३६६-२१६८८८) कल्लाङ्म१ें३्रङ्मल्ल अल्ल िउङ्मे४ल्ल्रूं३्रङ्मल्ल ळीूँल्लङ्म’ङ्मॅ८. सावंतवाडी- सिंधुुदुर्ग डायोसिझल डेव्हलपमेंट सोसा. सावंतवाडी (०२३६३-२७४२५३) ऌङ्म२स्र्र३ं’्र३८ अ४३ङ्मेङ्म३्र५ी फीस्रं्र१ हे कोर्स सुरू आहेत. तर मालवण-सुकळवाड (एमआयटीएम) ठिकाणी उङ्मे४ल्ल्रूं३्रङ्मल्ल र‘्र’’ इं१ु्र’्र्िरल्लॅ र३ी’’ ऋ्र७ी१ हे कोर्स सुरू आहेत. यात संध्या. १३ बॅच सुरू आहेत. ह्या बॅच पूर्णपणे शासनस्तरावर विनामूल्य देण्यात येत आहेत. संबंधित प्रशिक्षण संस्थांना शासन त्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क देते.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगार मेळावे, रोजगार क्षमता चाचणी, समुपदेशन, प्रशिक्षण मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार व सहाय्य, उद्योजकांसाठी मार्गदर्शन, कल चाचणी, आवडीनुसार करिअर असे विविध सल्ले येथे देण्यात येत आहेत. शिवाय खासगी कंपनी, बँका यामध्ये होणारी भरती विषयक मेळावे आयोजित केले जातात. त्यामुळे येथे प्रवेश घेणाऱ्या आजच्या पिढीला हे ज्ञान उपयोगी ठरेल.
- राजू वाकुडे, मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाचा लाभ घेऊन आपल्या आवडीनुसार करिअर करावे. ज्या संस्थांमार्फत आम्ही ट्रेनिंग देणार, त्याच संस्था प्रशिक्षणार्थींना रोजगार, नोकरी मिळवून देणार आहेत. या उपक्रमात पारदर्शकता ठेवली आहे. हा मोठा कायृक्रम असून, जिल्ह्यात १३ बॅच सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तरूणांनी याचा लाभ घ्यावा.
- जमीर करीम, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सिंधुदुर्ग