शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्यातील 4 संशयीत पोलिसांच्या ताब्यात, कारही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:40 PM2021-12-19T12:40:18+5:302021-12-19T12:41:15+5:30

परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता.

4 suspects arrested in shiv sena worker Santosh Parab attack, car also seized in kankavali | शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्यातील 4 संशयीत पोलिसांच्या ताब्यात, कारही जप्त

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्यातील 4 संशयीत पोलिसांच्या ताब्यात, कारही जप्त

Next
ठळक मुद्देपरब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक शिवसेना कार्यकर्ते संतोष मनोहर परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांना हल्ल्यात वापरलेल्या कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांनी त्या हल्ल्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मात्र, हा हल्ला नेमका कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या वेळी वापरलेली इनोव्हा कार  फोंडाघाट तपासणी नाक्यावर पोलिसांनी पकडली. तसेच त्यातील चारही संशयितांना ताब्यात घेऊन ओरोस पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. त्यानंतर स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाजा आड  कसून चौकशी केल्याचे समजते. मात्र ,चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही.
     
परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब विचारपूस करत खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जखमी परब ची विचारपूस केल्याचे सांगितल्याने या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले होते. त्यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. तर आमदार नितेश राणे यांनी राजकीय गुगली टाकत परब यांच्यावरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून झाल्याचे सांगत या प्रकरणात ट्विस्ट निर्माण केला होता. जिल्ह्यात सुरू असलेल्या ४ नगरपंचायत निवडणूका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान चारही आरोपींना आज (रविवारी) रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: 4 suspects arrested in shiv sena worker Santosh Parab attack, car also seized in kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.