सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४0 टक्के मतदान , पोलिसांचा कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:24 PM2017-10-16T15:24:04+5:302017-10-16T15:29:02+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी पोलिसानी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ३२५ ग्रामपंचायती पैकी २९ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १७३५ जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी असला तरी आतापर्यंत ४0 टक्के मतदान जिल्ह्यात झाले आहे.
सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी पोलिसानी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
३२५ ग्रामपंचायती पैकी २९ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १७३५ जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी असला तरी आतापर्यंत ४0 टक्के मतदान जिल्ह्यात झाले आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी कणकवली- वरवडे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार असून राणेसमर्थकांनी आपल्या नव्या पक्षाच्या बांधणीसाठी जोरदार तयारी केली होती. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसणार आहे.
दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर ४0 टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी केंद्रावर गर्दी होती.
दरम्यान, निवडणूकीच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यात राडा झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. कट्टर राणे समर्थक आणि भोयाचे केरवडे उपसरपंच राजू मल्हार यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. भोयाचे केरवडे येथील ही घटना मध्यरात्री १ वाजून ३0 मिनिटांनी घडली. मनसे कार्यकर्त्यांंनी हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय असून या हल्ल्यात लोखंडी शिगा, दांडे वापरले गेले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.