रत्नागिरी जिल्हा बॅँकेसाठी ४४ उमेदवार
By admin | Published: May 5, 2015 12:47 AM2015-05-05T00:47:06+5:302015-05-05T00:48:57+5:30
रत्नागिरी जिल्हा बॅँकेसाठी ४४ उमेदवार
रत्नागिरी : जिल्हा बॅँक संचालक मंडळाच्या २० जागांसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत प्रथमच कॉँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्या सहकार पॅनेलविरोधात शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलने दंड थोपटल्याने आजच्या निवडणुकीकडे व ७ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलचे उदय बेलोसे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा बॅँक निवडणुकीत २० जागांसाठी सहकार व शिवसंकल्प या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. चार अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत उतरल्यामुळे ४४ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सत्ताधारी सहकार पॅनेलने गेल्या पाच वर्षांत केलेल्या बॅँकेच्या प्रगतीबाबतचे मुद्दे मतदारांसमोर मांडले आहेत, तर शिवसंकल्पच्या नेत्यांनी सहकारने नोकरभरतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत मतदारांना जिल्हा बॅँकेत परिवर्तनासाठी हाक दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रथमच चुरस निर्माण झाली आहे.