सावंतवाडी एसटी स्टँडमध्ये दोन युवकांकडून 50 हजारांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:51 IST2021-07-13T19:48:55+5:302021-07-13T19:51:12+5:30
liquor ban Crimenews Sawantwadi Sindhudurg : बेकायदेशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी बस स्थानक कडून २ युवकांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सावंतवाडी एसटी स्टँडमध्ये दोन युवकांकडून 50 हजारांची दारू जप्त
ठळक मुद्देबेकायदेशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी २ युवकांना अटक सावंतवाडी एसटी स्टँडमध्ये तपासणी, 50 हजारांची दारू जप्त
सावंतवाडी : बेकायदेशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी बस स्थानक कडून २ युवकांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल मंचुरिया ( वय ३३), अजय लालवाणी ( वय ४३, दोघेही रा. गांधीनगर,कोल्हापूर ) हे दोघेही आज सावंतवाडी बस स्थानक येथे संशयित रित्या बसले होते.
यावेळी त्यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या बँग मध्ये एकूण ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज सकाळी ११ च्या सुमारास करण्यात आली आहे.