‘आशा’ना दिवाळीआधी ५00 रूपयांची भेट

By admin | Published: March 11, 2015 11:10 PM2015-03-11T23:10:52+5:302015-03-12T00:04:37+5:30

संदेश सावंत : सिंधुदुर्गातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कारांचे वितरण

500 rupees gift before 'Asha' before Diwali | ‘आशा’ना दिवाळीआधी ५00 रूपयांची भेट

‘आशा’ना दिवाळीआधी ५00 रूपयांची भेट

Next

सिंधुदुर्गनगरी : आरोग्य विभागाच्या सर्व योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य आशा स्वयंसेविका करतात. या आशा स्वयंसेविकांना जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करून प्रत्येकी ५०० रुपये दिवाळी भेट दिवाळीच्या अगोदर देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत सन २०१३-१४ सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक व आशा आणि नाविन्यपूर्ण सखी योजना पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व्यवस्थापक संतोष सावंत तसेच तालुका आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत म्हणाले की, आशा स्वयंसेविका गावस्तरावर आरोग्य विभागाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांच्या या कामाचा गौरव करण्याचा हा छोटासा सोहळा नक्कीच आशा स्वयंसेविकांना बळ देणारा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, आशा स्वयंसेविका करत असलेले काम हे मोठे काम आहे. गावपातळीपर्यंत शासनाच्या आरोग्याच्या योजना आशा पोहोचवित असतात आणि त्यांच्या कामामध्ये असाच उत्साह कायम राहावा, यासाठी शासनाकडून कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे आणि हा सोहळा आशा स्वयंसेविकांना पुढील वाटचालीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी सभापती स्नेहलता चोरगे, सदस्य प्रमोद कामत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यानी मनोगत व्यक्त केले, तर आशांमधून नेहा गवस, अर्चना धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे समन्वयक संतोष सावंत यांनी शेवटी आभार मानले. यावेळी आशा स्वयंसेविकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

प्राथमिक आरोग्यकेंद्रनिहाय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका
प्राथमिक आरोग्यकेंद्रनिहाय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांमध्ये सविता कदम (वैभववाडी), शाफिना बोबडे (उंबर्डे), दीपिका शेट्ये (खारेपाटण), सुविधा तळेकर (कासार्डे), अमिता पेंडूरकर (कनेडी), मेघना लाड (फोंडा), मेघना घाडीगावकर (कळसुली), सिमरन तांबे (नांदगाव), प्राची पवार (वरवडे), स्नेहल कोठावळे (पडेल), जयश्री अनभवणे (मोंड), हेमलता कोर्लेकर (फणसगांव), किरण कोकम (मिठबाव), जान्हवी पाटील (इळये), माधुरी किंजवडेकर (शिरगाव), प्रीती कदम (आचरा), नाझिया शेख (मसुरे), अक्षता गोसावी (चौके), लीना तळगावकर (गोळवण), रिना सावंत (हिवाळे), रोशनी खंदारे (कडावल), शीतल चव्हाण (कसाल), यास्मिन शेख (पणदूर), रागिणी गोसावी (हिर्लोक), राजलक्ष्मी सावंत (माणगाव), माधवी तेंडोलकर (वालावल), राजलक्ष्मी परुळेकर (परुळे), सुरुची दाभोळकर (आडेली), सुवर्णा रेडेकर (रेडी), अक्षता साळगांवकर (तुळस), अश्विनी रेगे (मळेवाड), प्रियांका राऊळ (सांगेली), मेधा परब (निरवडे), दीक्षा देसाई (आंबोली), मनीषा देसाई (बांदा), रविना नाईक (साटेली भेडशी), शर्मिला गावस (मोरगाव), शीतल सावंत (तळकट) आदींचा समावेश आहे. या आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिकवितरण  .तालुकास्तर सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका
सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पारितोषिकासाठी सुश्मिता कांबळे (उंबर्डे), यास्मिन साटविलकर (नांदगांव), सुश्मिता परब (मोंड), अर्चना धुरी (मसुरे), अर्चना नाईक (माणगाव), प्रीती राऊळ (आडेली), राजश्री नाईक (आंबोली), विजया देसाई (साटेली भेडशी) यांची निवड करण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी समीक्षा जठार (वैभववाडी), मनिषा जाधव (फोंडा), विषया दळवी (शिरगांव), समीक्षा लाड (हिवाळे), सायली राणे (पणदूर), प्रतीक्षा रेडकर (रेडी), गायत्री काडरकर (सांगेली), भाग्यश्री बागकर (मोरगाव) यांना पारितोषिके वितरण
सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक
जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक म्हणून वैष्णवी ठाकूर (कनेडी), विशाखा लाड (कळसुली), पल्लवी नाचणकर (मसुरे), सोनल मोर्ये (तुळस), अर्चना रेगे (मळेवाड), नेहा गवस (साटेली भेडशी) यांना जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक म्हणून प्रत्येकी ३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय सवोत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून ८ हजार रुपये पारितोषिक असलेल्या प्रथम क्रमांकासाठी प्रज्ञा धोपटे (इळये), तर ६ हजार रुपये पारितोषिक असलेल्या द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी स्नेहल साटम (शिरगाव) यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

Web Title: 500 rupees gift before 'Asha' before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.