तिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा

By admin | Published: September 6, 2015 08:44 PM2015-09-06T20:44:21+5:302015-09-06T20:44:21+5:30

धीरज साळे : गतवर्षीच्या तुलनेत कमी, मात्र स्थिती चांगली

64 percent water stock in Tilari Dam | तिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा

तिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा

Next

वैभव साळकर - दोडामार्ग   गोवा आणि महाराष्ट्र राज्याचा मानबिंदू ठरलेल्या तिलारी धरणात यावर्षी ६४ टक्के पाणी साठा झाला आहे. आतापर्यंत धरणातील पाणी १०२.२७ मीटर एवढे वाढले असून ते २८७.१४८ द. ल. घ. मी. एवढे आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट अखेर धरणात झालेला पाणी साठा कमी आहे. मात्र स्थिती चांगली आहे. असा दावा तिलारीचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या परिसरात पाऊस मुबलक प्रमाणात पडत असल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या परिसरातील जमिनी शेतीसाठी सोयीस्कर झाल्या असून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गोवा राज्याला तिलारी धरणातून आवश्यक पाणी मिळत असल्याने गोवा राज्यातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. तिलारी धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे गोवा राज्याला पाणी पुरवठा केला जातो.
डावा व उजवा या दोन कालव्यातून पेडणे गोवा व डिचोली तालुका तसेच अस्नोडा येथे या पाण्याचे शुध्दीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दोडामार्गात आगमन केले. जलप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे तिलारी धरणातील पाण्याची पातळी विषयी विचारणा केली असता या तिलारी धरण पात्रातील गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहता सद्यस्थितीत या धरणातील पाणी १०२.२७ मीटर एवढे वाढले असून, हे पाणी जवळजवळ २८७.१४८ दशलक्षघमी एवढे असल्याचे सांगितले.
तिलारी धरण सध्या चालू परिस्थितीत ६४.१८ टक्के भरलेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच या तिलारी धरणातील महालक्ष्मी जलविद्युत प्रकल्पाला ११ क्यूमी एवढे पाणी प्रत्येक दिवशी सोडण्यात येते. तसेच २०१४-१५ या वर्षीची माहिती घेतली, त्यावेळी जून, जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत २२६८.८० मिमी पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. तसेच चालू दोन महिन्यांचा कालावधी पाहता हाच पाऊस १७९१.८० मिमी झाल्याचे सांगण्यात आले.

पुरेसा पाणीसाठा
तिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा सध्या आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा कमी आहे. याबाबत कार्यकारी अभियंता धीरज साळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पाणीसाठा पुरेसा आहे. एकदमच स्थिती काही वाईट नाही. एवढे धरण कोरडे रहावेच लागते. संपूर्ण धरण भरूनही चालत नसल्याचे साळे म्हणाले.

Web Title: 64 percent water stock in Tilari Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.