सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

By सुधीर राणे | Published: September 18, 2022 06:07 PM2022-09-18T18:07:37+5:302022-09-18T18:08:34+5:30

कोरोनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

66 active patients of Corona in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Next

कणकवली - जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ५६ हजार ६४७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजूनही पूर्णतः कोरोनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यात रविवारी  आणखी ९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यापासून आजपर्यंत १५३८ कोरोना बाधित रुग्ण मृत झालेले आहेत. तरआज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५८,२५१आहेत. तालुका निहाय  आजचे पॉझिटिव्ह रुग्णपुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये कणकवली१,कुडाळ ३,  सावंतवाडी २, वैभववाडी २ तर वेंगुर्ला येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

आतापर्यंतचे तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण देवगड ७०२४, दोडामार्ग ३३३७, कणकवली १०६९९, कुडाळ १२०४१, मालवण ८३१८, सावंतवाडी ८६८३,  वैभववाडी २५७९, वेंगुर्ला ५२३० तसेच  जिल्ह्याबाहेरील ३४० रुग्णांचा समावेश आहे. 

तालुका निहाय सक्रीय रुग्णांमध्ये देवगड१, दोडामार्ग ५, कणकवली ८, कुडाळ१६,मालवण १२, सावंतवाडी १३, वैभववाडी ३, वेंगुर्ला५ व जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये देवगड तालुक्यातील १८५, दोडामार्ग ४८,  कणकवली ३२२, कुडाळ २५५, मालवण ३०१, सावंतवाडी २१७, वैभववाडी ८४, वेंगुर्ला ११७ तर जिल्ह्याबाहेरील ९ रुग्णांचा समावेश आहे.
 

Web Title: 66 active patients of Corona in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.