जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 10:59 PM2017-02-22T22:59:53+5:302017-02-22T22:59:53+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : वेंगुर्लेत सर्वाधिक, सर्वात कमी दोडामार्ग तालुक्यात
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून ३ लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ले तालुक्यात तर सर्वात कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0 तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील ५ लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्यातील ८३८ मतदान केंद्रांवरून जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ६३२ मतदार आहेत. यात २ लाख ८0 हजार ९१ पुरुष तर २ लाख ८३ हजार ५४१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी मंगळवारी ३ लाख ८0 हजार ७११ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात १ लाख ९४ हजार २४२ पुरुष तर १ लाख ८६ हजार ५६९ स्त्री मतदारांचा समावेश आहे आणि याची टक्केवारी ६७.५५ एवढी आहे.
यात वैभववाडी तालुक्यात ३२ हजार ५५४ मतदार असून त्यापैकी २0 हजार ३६३ मतदारांनी मतदान केले. यात ९ हजार ६५५ पुरुष व १0 हजार ७0८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यात ८९ हजार ७४९ मतदार असून त्यापैकी ५९ हजार ४१६ मतदारांनी मतदान केले. यात ३0 हजार १५५ पुरुष तर २९ हजार २६१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. देवगड तालुक्यात ७७ हजार ४५४ मतदार असून त्यापैकी ५१ हजार ५८0 मतदारांनी मतदान केले. यात २५ हजार ९0१ पुरुष तर २५ हजार ६७९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मालवण तालुक्यात ७१ हजार ७९ मतदार असून त्यापैकी ४७ हजार ४४२ मतदारांनी मतदान केले. यात २४ हजार २७९ पुरुष तर २३ हजार १६३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. कुडाळ तालुक्यात १ लाख ३ हजार ९0५ मतदार असून त्यापैकी ७१ हजार ४१ मतदारांनी मतदान केले. यात ३६ हजार ६६२ पुरुष तर ३४ हजार ३७९ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
वेंगुर्ले तालुक्यात ५४ हजार २४ मतदार असून त्यापैकी ३८ हजार ७८५ मतदारांनी मतदान केले. यात २0 हजार ३५६ पुरुष तर १८ हजार ४२९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. सावंतवाडी तालुक्यात ९७ हजार ३६१ मतदार असून यापैकी ६८ हजार ६६२ मतदारांनी मतदान केले. यात ३५ हजार १८१ पुरुष तर ३३ हजार ४८१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुक्यात ३७ हजार ५0६ मतदार असून त्यापैकी २३ हजार ४२२ मतदारांनी मतदान केले. यात १२ हजार ५३ पुरुष तर ११ हजार ३६९ स्त्री मतदारांनी मतदान केले आहे.
जिल्ह्यात मतदान झाल्यावर मतदारांचा कौल आणि आपल्या पक्षाची मतदारसंघांमध्ये असलेली ताकद याचा अंदाज घेत काही पक्षांच्या उमेदवारांनी अंतर्गत हातमिळवणी करत ही निवडणूक लढविल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र प्रत्येक पक्षाच्यावतीने आपलीच सत्ता येईल अशी ग्वाही दिली जात आहे. मात्र खरे चित्र हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)