व्हीआयपी नंबरसाठी मोजलेत ६८ लाख रूपये
By admin | Published: April 27, 2015 10:36 PM2015-04-27T22:36:10+5:302015-04-28T00:21:31+5:30
किरण बिडकर : महसूली उत्पन्नात भर; रिक्षाचा टप पिवळ्या रंगाचा ठेवण्याचे आदेश
सिंधुदुर्गनगरी : आपल्या वाहनांचा नंबर व्हीआयपी असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र या एका व्हीआयपी नंबरला लाखो, हजारो रूपये मोजावे लागतात. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षात वाहनधारकांनी व्हीआयपी नंबरवर तब्बल ६८ लाख रूपये मोजले असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे.जिल्ह्यात नववर्ष, गुढीपाडवा, वाढदिवस, गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा, अक्षय्य तृतीया या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. वाहन पासिंग झाल्यानंतर प्रत्येक वाहनधारकाला उत्सुकता असते नंबरची.प्रत्येक वाहनधारकाला वाटत असते की आपल्याला एखादा चांगला व व्हीआयपी नंबर मिळावा. मात्र या व्हीआयपी नंबरला अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने काही वाहनधारक पैसे मोजून आपल्याला हवा तो नंबर घेतात तर वाहनधारक आरटीओ जो नंबर देईल त्या नंबरवर समाधान मानतात.वाहनधारकांना नंबरची बेरीज २७ किंवा समअक्षरी येण्यासाठी नंबरची आगाऊ बुकींग करतात. तर मोठे वाहनधारक हे आपल्याला १, २, ७, ९, ९९९, १०००, १०१, ११११ या नंबरसाठी हजारो, लाखो रूपये खर्चून नंबर खरेदी केला जातो. या एका नंबरसाठी ६० ते ७० हजार रूपये किंमत आहे. काहीजण लकी नंबर म्हणून तर काहीजण व्हीआयपी नंबरसाठी पैसे मोजायला मार्ग पुढे पाहत नाहीत.उपप्रादेशिक परिवहन विभागाला शासनाकडून दरवर्षी २६ ते २७ कोटी रूपये महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट दिले जाते. त्याची पूर्तताही या विभागामार्फत होताना दिसते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हीआयपी नंबरसाठी वाहनधारकांनी तब्बल ६७ लाख ७० हजार ५०० रूपये आरटीओ कार्यालयाकडे मोजल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे महसूली उत्पन्नात यामुळे भर पडण्यास मोठी मदत होत
आहे. (प्रतिनिधी)
वाहतुकीचे नियम पाळले जावेत व आॅटोरिक्षांमध्ये एकसुत्रता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ हजार ६२८ परमीटधारक रिक्षाचालकांना आपल्या रिक्षाचा टप पिवळ््या रंगाचा असावा, याबाबत सक्त आदेश देण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली. सिंधुदुर्गात ९६२८ परमीट व अन्य रिक्षा आहेत. मात्र यातील जवळजवळ सर्वच रिक्षांचा टप हा काळा, पांढरा व निळ््या रंगाचा असतो. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व रिक्षांमध्ये वाहतुकीचे नियम पाळले जावेत व आॅटोरिक्षांमध्ये एकसुत्रता यावी, यासाठी सर्व रिक्षाधारकांनी आपल्या रिक्षाचा टप पिवळा करणे आवश्यक आहे. याबाबतचे तोंडी आदेशही संबंधित रिक्षाचालकांना देण्यात आले आहेत.
रिक्षाधारक जेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभागात फिटनेस सर्टिफिकेटसाठी येईल त्यावेळी रिक्षाला पिवळा रंग आवश्यक आहे, अशी माहितीही यावेळी किरण बिडकर यांनी दिली. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील वेगवेगळ््या रंगात असणाऱ्या रिक्षा आता एकाच पिवळ््या रंगात दिसणार आहेत.