coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

By सुधीर राणे | Published: September 21, 2022 05:08 PM2022-09-21T17:08:13+5:302022-09-21T17:09:08+5:30

दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळत आहेत.

7 new corona patients in Sindhudurg district | coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext

कणकवली : जिल्ह्यात आज, बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५६ हजार ६८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज, आणखी ७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनामुळे आज अखेर मृत झालेले रुग्ण १५३८ आहेत. तर आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५८,२६० आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये देवगड १, कुडाळ २, मालवण ३ व सावंतवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

आतापर्यंतचे तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

देवगड ७०२५, दोडामार्ग ३३३७, कणकवली १०६९९, कुडाळ १२०४२, मालवण ८३२२, सावंतवाडी८६८५, वैभववाडी २५७९, वेंगुर्ला ५२३१ व जिल्ह्याबाहेरील ३४० रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 7 new corona patients in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.