लांजात ७५ टक्के मतदान

By admin | Published: January 19, 2015 12:00 AM2015-01-19T00:00:50+5:302015-01-19T00:31:56+5:30

मतमोजणी आज : ९ हजार ३९७ मतदारांनी बजावला हक्क

75 percent voting in the elections | लांजात ७५ टक्के मतदान

लांजात ७५ टक्के मतदान

Next

लांजा : सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या लांजा नगरपंचायतीसाठी आज, रविवारी मतदान शांततेत पार पडले. एकूण १२ हजार ४०६ मतदारांपैकी ९ हजार ३९७ मतदारांनी आपला हक्क बजावल्याने ७५.७५ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. उद्या, सोमवारी होणाऱ्या मतमोजणीमध्ये मतदारराजाने विजयाची माळ कोणत्या पक्षाच्या गळ्यात घातली आहे, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने अनेक ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे व ज्येष्ठ नेते राजन देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव आणि प्रदेश सरचिटणीस महमंद रखांगी, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार उदय सामंत, मालवणचे आमदार वैभव नाईक, तर भाजपने प्रदेश प्रवक्ते बाळ माने, संजय यादवराव, आदींनी या निवडणुकीत सहभाग घेतल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. आज, रविवारी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान सकाळी साडेसात वाजता धिम्यागतीने सुरू झाले. साडेनऊ वाजता १७ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या पुढच्या दोन तासांत ३७ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी जमा झाली होती. या कालावधीत ६८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. त्यानंतर ३.३० ते ५.३०पर्यंत उर्वरित मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मोठा प्रयत्न केल्याने अखेर ७५.७५ टक्के मतदान झाले. एकूण १२ हजार ४०६ मतदारांपैकी ९ हजार ३९७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये एकूण पुरुष ४ हजार ८२५, तर एकूण ४ हजार ५७२ महिलांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. लांजा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वांत जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व प्रभागांत माजी खासदार नीलेश राणे, शिवसेनेचे राजन साळवी, गणपत कदम, अजित यशवंतराव, महमंद रखांगी, संजय यादवराव यांनी भेटी दिल्या.

Web Title: 75 percent voting in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.