७६ ग्रामपंचायतीची होणार पोटनिवडणूक

By Admin | Published: July 20, 2016 11:15 PM2016-07-20T23:15:50+5:302016-07-21T00:55:25+5:30

१०२ जागा रिक्त : आॅगस्टच्या सुरूवातीस निवडणुकीची शक्यता

76 Gram Panchayat byelection byelection | ७६ ग्रामपंचायतीची होणार पोटनिवडणूक

७६ ग्रामपंचायतीची होणार पोटनिवडणूक

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : ७६ ग्रामपंचायतींमधील १०२ सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी २५ जुलैला जाहीर होणार आहे. त्यामुळे जुलै अखेरीस किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ७६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जून २०१६ पर्यंत ७६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या ९५ प्रभागमधील १०२ जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठी पोटनिवडणुकांची कार्यवाही निवडणूक प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, १२ जुलैपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. हरकती आल्या असतील, तर त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी २५ जुलैला प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे जुलैच्या अखेरीस किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ७६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली आहे.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत, त्यांचा तपशील असा : देवगड तालुक्यातील आरे, कुवळे, तोरसोळे, पाटगाव, बुरंबावडे, मोंडपार, शिरवली, फणसे, पावणाई, चाफेड, चांदोशी, कट्टा, वाघोटण, पाटथर, गोवळ, पुरळ, विजयदुर्ग, ओंबळ. कणकवली तालुका-करंजे, कोंडये, माईण, पिसेकामते, सावडाव, वायंगणी, कुरंगवणे, फोंडाघाट, कोळोशी, साकेडी, शिवडाव, कुंभवडे, सातरल. मालवण-आमडोस, आंबेरी, कातवड, किर्लोस, खोटले, घुमडे, चौके, पोईप, बंदिवडे बुद्रुक, बांदिवडे खुर्द, वायंगवडे, हडी, महाण, साळेल, तोंडवली.
वैभववाडी तालुका-अरूळे, आखवणे-भोम, गडमठ, मौदे, कुसुर. कुडाळ तालुका-पडवे, पोखरण-कुसबे, रानबांबुळी, कुंदे-वर्दे, पावशी, ओरोस बुद्रुुक. वेंगुर्ले तालुका-आसोली, अणसूर, केळूस, वायंगणी, पालकरवाडी, पाल. सावंतवाडी-तांबोळी, गेळे, शिरशिंगे. दोडामार्ग-केर भेकुर्ली, मोर्ले, कुडासे खुर्द, परमे पणतुर्ली, खोकरल, विर्डी, भुकेरी, बोडण, माटणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)


२५ जुलै : अंतिम यादी
७६ ग्रामपंचायतीसाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असून अंतिम मतदार यादी २५ जुलैला जाहीर होणार आहे.

Web Title: 76 Gram Panchayat byelection byelection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.