चिपळुणात ८८.७६ टक्के घरपट्टी वसूल

By admin | Published: April 6, 2016 10:45 PM2016-04-06T22:45:48+5:302016-04-06T23:46:59+5:30

पाणीपट्टी ८० टक्के वसूल : कर न भरणाऱ्या ५६ नळधारकांंची जोडणी तोडली

88.76 percent of the recovery in Chhitunya house | चिपळुणात ८८.७६ टक्के घरपट्टी वसूल

चिपळुणात ८८.७६ टक्के घरपट्टी वसूल

Next

चिपळूण : येथील नगरपरिषदेची २०१५ - १६ मार्चअखेरची घरपट्टी वसुली ८८.७६ टक्के, तर पाणीपट्टी वसुली ८० टक्के झाली आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्या ५६ जणांवर कारवाई करुन त्यांची नळजोडणी तोडण्यात आली आहे.
चिपळूण नगर परिषदेने वसुली मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदारांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे वसुलीत पालिकेने आघाडी घेतली आहे. नगरपरिषद हद्दीत एकूण १८ हजार ९५२ घरे असून, सर्व करदात्यांना घरपट्टी भरण्याबाबत बिलांचे वाटप करण्यात आले होते. करदात्यांना मार्चअखेर रक्कम भरता यावी, यासाठी सुटीच्या दिवशीही सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात आले होते. चालू वर्षाची एकूण मागणी ९.५० लाख होती. त्यापैकी ६.८७ लाख वसुली झाली आहे. काही करदात्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही सुरु आहे.
शहर व परिसरात ७ हजार ५५ नळधारक असून, १ कोटी २६ लाखांपैकी १ कोटी ३० हजार रुपये म्हणजेच ८० टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. ज्या नळधारकांनी ठरलेल्या मुदतीत पाणीपट्टी भरलेली नाही, अशा ५६ जणांची नळजोडणी बंद करण्यात आली आहे.
घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी करदात्यांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन करभरणा करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजू खातू यांच्यासह प्रभागनिहाय वसुलीप्रमुख व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
चिपळूण नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता स्वतंत्र विभागप्रमुख काम पाहात असून, खेर्डी पंपहाऊस येथून पाण्याचा उपसा करुन हे पाणी शहर व परिसराला पुरविले जाते. गोवळकोट येथेही पंपहाऊस आहे. पाणी उचलण्यासाठी वर्षाला सुमारे १ लाख ४० हजारपर्यंत विजेचे बिल येते. पाणी योजना तोट्यात असली तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नळांना मीटर बसवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. गेल्यावर्षीपासून ९०० रुपयांऐवजी १२०० रुपये पाणीपट्टी करण्यात आली आहे. (वार्ताहर)


नगर परिषदेला पाणी, घरपट्टी, वृक्ष कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, अग्निशमन कर आदींच्या माध्यमातूनही आर्थिक उत्पन्न मिळत असते. यावर्षी वृक्षकर ८४.९७ टक्के, शिक्षण कर ८६.६५ टक्के, रोजगार हमी कर ८३.९५ टक्के, अग्निशमन कर ८०.१९ टक्के अशी एकूण नगर परिषदेची ८७.८३ टक्के करवसुली झाली आहे.

Web Title: 88.76 percent of the recovery in Chhitunya house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.