कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 06:25 PM2018-09-28T18:25:13+5:302018-09-28T18:27:47+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

9 00 crore investment in Kankavali waste management, process | कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

Next
ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईलया प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिन ए. जी. डॉटर्स या कंपनीला देण्यात येणार आहे. शून्य कचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणारा हा प्रकल्प होण्यासाठी ९०० कोटीची गुंतवणूक या  कंपनीकडून करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी येथे केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईल. देशातील तिसरा अन महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प या निमित्ताने कणकवलीत होत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली नगरपंचायत सभागृहात ए. जी. डॉटर्स कंपनीकडून कचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतर प्रक्रीयेचा प्रस्ताव नगरपंचायतकडे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सादर केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अ‍ॅड. विराज भोसले, अबिद नाईक, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, कविता राणे, उर्मी जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने आम्ही कणकवलीत आणत आहोत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा प्रकल्प २४ तास सुरु राहील. याठिकाणी २५ वर्षे कामकाज सुरु राहणार आहे. पुढील आठ महिन्यात प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी पाईपलाईनचा गॅस निर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. 

कचरा व्यवस्थापनातून विकासाचा राजमार्ग !
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजचा हा दिवस ऐतिहासीक नोंद करणारा आहे. जिल्ह्यातील कचºयाचा प्रश्न कणकवली नगरपंचायतच्या पुढाकारामुळे मार्गी लागत आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणुन सातत्याने दोन वर्षे सिंधुुदुर्गाचा सन्मान झाला आहे. ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शून्य कचरा व्यवस्थापनातून पुढील २५ वर्षे जिल्हा देशात अव्वल राहील. कणकवलीचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हाती घेतलेले हे शिवधनुष्य लवकरच यशस्वी होईल. या प्रकल्पातुन कचºयाच्या माध्यमातून एक विकासाचा राजमार्ग उभा राहतो, हे आमच्या विरोधकांना दिसेल.असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी  सांगितले. 


कणकवली नगरपंचायत येथे शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतराचा प्रस्ताव ए. जी. डॉटर्स कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी सादर केला . यावेळी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (अनिकेत उचले)

 

Attachments area

Web Title: 9 00 crore investment in Kankavali waste management, process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.