९२ हजार ८५0 रुपयांचा गुटखा जप्त, तंबाखू नियंत्रण पथकामार्फत कुडाळ येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:36 AM2019-03-22T11:36:12+5:302019-03-22T11:37:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुडाळ शहरामध्ये जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाने धाड टाकली. त्यामध्ये बाजारपेठ, शाळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुडाळ शहरामध्ये जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाने धाड टाकली. त्यामध्ये बाजारपेठ, शाळा तसेच रुग्णालयाच्या आवारामध्ये जिथे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते अशांवर कोप्टा २00३ अंतर्गत ७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच ९२ हजार ८५0 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
या पथकामध्ये आरोग्य, अन्न प्रशासन, तसेच पोलीस विभागाचा समावेश होता. सदर कारवाई वेळी अन्न प्रशासन आयुक्त तुषार शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रियंका वाईकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार पौर्णिमा बिद्रे, समुपदेशक अनंद परब, सामाजिक कार्यकर्ता कार्मिस अल्मेडा तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.