दाभिल जत्रोत्सवात जुगार अड्ड्यावर छापे , ९ जण अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:24 PM2020-12-31T17:24:27+5:302020-12-31T17:25:37+5:30

Crime News Sindhudurg- ऐन थर्टीफर्स्टच्या दिवशी सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे मोठी कारवाई केली आहे . दाभिल गावात जत्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या तब्बल ९ जणांना छापे टाकून अटक करण्यात आली आहे.तर काही जण पळून गेले आहेत . ही कारवाई पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यात दोन दुचाकी एक कार व रोख रक्कम मिळून तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

9 arrested for raiding gambling den during Dabhil Jatrotsav | दाभिल जत्रोत्सवात जुगार अड्ड्यावर छापे , ९ जण अटक !

दाभिल जत्रोत्सवात जुगार अड्ड्यावर छापे , ९ जण अटक !

Next
ठळक मुद्दे दाभिल जत्रोत्सवात जुगार अड्ड्यावर छापे , ९ जण अटक ! एलसीबीची कारवाई ; कार व दोन गाड्यांसह सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

बांदा  : ऐन थर्टीफर्स्टच्या दिवशी सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे मोठी कारवाई केली आहे . दाभिल गावात जत्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या तब्बल ९ जणांना छापे टाकून अटक करण्यात आली आहे.तर काही जण पळून गेले आहेत . ही कारवाई पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यात दोन दुचाकी एक कार व रोख रक्कम मिळून तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेजिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली . जुगार खेळताना विद्याधर महादेव घाडी ( दाभिल ) , सुरेश तानाजी दळवी ( विलवडे ) , सुधाकर दत्ताराम गाड ( उगाडे ) , संजय कृष्णा गावडे ( सरमळे ) , प्रकाश जगन्नाथ दळवी ( विलवडे ) , राजेश वामन सावंत ( वाफोली ) , सिद्धेश चंद्रकांत कुडव ( इन्सुली ) , कृष्णा न्हानू घाडी ( दाभील ) व विजय श्रीधर परब ( भालावल ) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
.
घटनास्थळावरुन वॅगनर कार ( जीए ०३ पी ००३९ ) , पल्सर मोटरसायकल ( एमएच ०७ एडी ७९२० ) व अ‍ॅक्टिव्हा गाडी ( एमएच ०७ एसी ५५९० ) जप्त करण्यात आली .त्यांच्याकडून एकूण ८२ हजार ८०० रुपयांच्या रोकडसह एकूण ४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

हि कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेळके , सहाय्यक पोलीस फौजदार आर . बी . शेळके , पोलीस हवालदार एस . वाय . सावंत , जी . बी . कोयंडे , पोलीस नाईक पी . एस . कदम , ए . एस . धुरी , के . ए . केसरकर , पी . पी . वालावलकर , पोलीस काँस्टेबल आर . एस . इंगळे , पी . पी . गावडे , सी . एस . नार्वेकर , डी . ए . कांदळगावकर यांच्या पथकाने केली . याबाबत एलसीबीचे प्रमोद काळसेकर यांनी बांदा पोलीसांत तक्रार दिली आहे .

Web Title: 9 arrested for raiding gambling den during Dabhil Jatrotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.