दहावीच्या ९० प्रश्नपत्रिका अपुऱ्या
By admin | Published: March 12, 2015 11:20 PM2015-03-12T23:20:36+5:302015-03-12T23:51:57+5:30
सावंतवाडी, कुडाळात प्रकार : वाटल्या प्रश्नपत्रिकेच्या छायांकित प्रती
सावंतवाडी : चिपळूण येथे दहावीच्या परीक्षेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला असतानाच तसाच प्रकार गुरुवारी सावंतवाडीतील चार व कुडाळमधील केंद्रावर घडला. इंग्रजी माध्यमातील बहुसंच पद्धत ‘डी’मधील भूमिती या विषयाच्या प्रश्नपत्रिका या पाच केंद्रांवर कमी आल्या होत्या. त्यामुळे ९० प्रश्नपत्रिका छायांकित करून वितरित केल्या. आंबोली सैनिक स्कूलच्या केंद्रावर तब्बल एक तास, तर अन्य केंद्रांवर २0 मिनिटे उशिरा पेपर सुरू करण्यात आला होता. या प्रकारामुळे विद्यार्थिवर्गात खळबळ उडाली होती.
गेल्याच आठवड्यात चिपळूण येथील माध्यमिक शालांत परीक्षेच्या केंद्रावर तब्बल ४५० प्रश्नपत्रिका कमी आल्याने त्या प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती वाटण्याच्या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली होती. तसाच प्रकार गुरुवारी सावंतवाडी आणि कुडाळ येथील केंद्रावर घडला. गुरुवारी भूमिती या विषयाचा पेपर होता, त्यासाठी सावंतवाडीतील
राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कस्टडीत प्रश्नपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. प्रश्नपत्रिकांचे वाटप करताना हा प्रकार लक्षात आला. (प्रतिनिधी)