ऑनलाईन ई-संजीवनीचा ९५ रुग्णांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 03:10 PM2021-04-10T15:10:18+5:302021-04-10T15:14:21+5:30
Online Medical Help sindhudurg-ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरकडे जावे लागत नाही, तर डॉक्टर एका क्लिकवर रुग्णांना मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. या सेवेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना ई-संजीवनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
ओरोस : हॅलो... डॉक्टर साहेब, घसा दुखतोय, खोकला आहे... असा संवाद जिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टरांत होत आहे. ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरकडे जावे लागत नाही, तर डॉक्टर एका क्लिकवर रुग्णांना मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. या सेवेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना ई-संजीवनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारावर सल्लामसलत करण्यासाठी, रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात रांगेत उभे रहावे लागू नये, ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा व तालुकास्तरावर येण्यासाठी लागणारा आर्थिक भूर्दंड कमी व्हावा यासाठी शासनाने ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यात मे २०२० पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्षात ही योजना नोव्हेंबर २०२० नंतर सुरू करण्यात आली आहे.
याबाबत डॉक्टरांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. ई-संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. तसेच ही सेवा www.esanjeevaniopd.in या वेबसाईटच्या माध्यमातून लॅपटॉप व संगणकावरून घेता येते. ही सुविधा सकाळी ९:३० ते १:३० तर दुपारी ३ ते ५ या वेळेत उपलब्ध असणार आहे. तर रविवारी ही सुविधा उपलब्ध नसेल. सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना अँड्रॉईड मोबाईलद्वारे ह्यई-संजीवनी ओपीडीह्ण या संकेतस्थळावर किंवा ह्यसंजीवनी ओपीडी अॅपह्णद्वारे नोंदणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेता येतो.